आता वणीजवळ सापडला मानवी हाडांचा सापळा, उडाली खळबळ

तरुणीचा मृतदेह असल्याचा प्राथमिक अंदाज, पोलिसांचा तपास सुरु

 बहुगुणी डेस्क, वणी: भालर मार्गावरील एमआयडीसी परिसरालगतच्या जंगलात गुरुवारी, दि. 21 ऑगस्ट 2025 रोजी दुपारच्या सुमारास मानवी हाडांचा सापळा आढळून आला. दोन दिवसांपूर्वी घुग्घुस रोडवर एक खून झालेला मृतदेह आढळला होता. त्यानंतर ही घटना उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कवटी आणि दोन्ही पायांची हाडे वेगवेगळी आढळून आली असून, मृतदेहाजवळ बांगडी आणि साडी सापडल्याने हा मृतदेह महिलेचा असल्याचा प्राथमिक अंदाज बांधला जात आहे.

भालर रोडवरील नाल्याजवळ एक मानवी सांगाडा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. घटना उघडकीस येताच वणी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मोकाट श्वानांनी मृतदेह कुरतडल्याने ओळख पटविणे अवघड झाले आहे. मृतदेहाच्या जवळच एक साडी व तुटलेली बांगडी आढळून आली. त्यामुळे एखाद्या युवतीचा असण्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी डीएनए चाचणी करण्यात येणार असल्याचे वणीचे पोलिस निरीक्षक गोपाल उंबरकर यांनी दिली. 

या प्रकरणाची पोलिसांनी नोंद केली असून या महिलेचा घटनास्थळीच मृत्यू झाला की त्याला कोणी आणून टाकले, याचा शोध घेण्यासाठी वणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वीच या घटनास्थळाच्या काही अंतरावर घुग्घुस रोडवर एका खून झालेल्या इसमाचा मृतदेह आढळला होता. पोलीस घटनेचा तपास करीत आहे. दरम्यान कुणी तरुणी किंवा महिला अनेक दिवसांपासून बेपत्ता असल्यास मृतदेहाची ओळख पटवून घ्यावी, असे आवाहन ठाणेदार गोपाळ उंबरकर यांनी केले आहे. 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

सावधान ! पोळा-बडग्याला फुटू शकतो घरफोडीचा पोळा…

RN सोलर सिस्टीमची झटका मशिनवर पोळा, गणेशोत्सव ऑफर सुरु

Comments are closed.