RN सोलर सिस्टीमची झटका मशिनवर पोळा, गणेशोत्सव ऑफर सुरु
पहिल्यांदाच 50 एकरची झटका मशिन सर्वात कमी किमतीत...
बहुगुणी डेस्क, वणी: गेल्या 12 वर्षांपासून वणी आणि परिसरातील शेतक-यांचे विश्वास संपादन करणारे RN सोलर सिस्टममध्ये पोळा व गणेश चतुर्थी ऑफर सुरू झाली आहे. यात 50 एकरची मशिन आतापर्यंतच्या सर्वांत कमी दरात शेतक-यांना मिळणार आहे. यासह इतर सोलर झटका मशिन अवघ्या 2990 रुपयापासून उपलब्ध आहे. ही ऑफर गणेशोत्सव सुरु असे पर्यंत सुरु राहणार आहेत. यासह पेरणी यंत्र, सोलर कॅमेरा, बार्किंग डॉग, टॉर्च, फवारणी यंत्र इत्यादी असेसरीज देखील अगदी वाजवी दरात उपलब्ध आहेत. दुकान व गोडावूनची नवीन वेळ ही स. 7 ते रात्री 9 पर्यंत राहणार आहे. याची ग्राहकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन संचालक निकेश निब्रड यांनी केली आहे. ग्राहकांना अधिक माहितीसाठी हनुमान मंदिराजवळ जैन ले आऊट (नवीन गोडावून) किंवा ब्लॉक नंबर 38, ओरीजीन कॉम्प्युटर जवळ वरोरा रोड वणी येथील कार्यालयात किंवा 9767816735 व 8999952507 या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे.
सोलर झटका मशिनचे वैशिष्ट्ये
येथे उपलब्ध असलेली मशिन ही झटका मशिनमध्ये सुप्रसिद्ध असलेल्या Z + सुरक्षा या ब्रँडची आहे. 15 एकरच्या मशिनमध्ये 12 वोल्ट व 12 एम्पीअरची बॅटरी आहे. 20 वॅटची सोलर प्लेट या मशिनला लावलेली आहे. तर 50 एकर मशिनमध्ये 12 वोल्ट व 32 एम्पीअरची बॅटरी आहे. 40 वॅटची सोलर प्लेट या मशिनला लावलेली आहे. तसेच यात अर्थिंग तार, अर्थिंग प्लेट, कनेक्शन वायर, 100 इन्सुलेटर,वायर दिला जातो. विशेष म्हणजे ही मशिन डायरेक्ट मॅन्युफॅक्चरर करून ग्राहकांना दिली जाते. विशेष म्हणजे डेमो सुविधा देखील ग्राहकांना उपलब्ध आहे. त्यामुळे आधी खात्री करून नंतरच मशिन विकत घेण्याचा उत्तम पर्याय ग्राहकांना उपलब्ध आहे.

सदर मशिन ही रात्री बंद होते तर सकाळी सुरू होते. एक आठवडा जरी सूर्यप्रकाश नसला तरी मशिन काम करीत राहते व पिकांचे संरक्षण होते. तार तुटल्यास किंवा पिकांच्या फांदीचा स्पर्श झाल्यास अलार्म सुरू होतो. बॅटरी डिसचार्ज होत नाही. कोरड्या जमिनीवरही ही सिस्टिम काम करते. याशिवाय अर्थिंगसाठी तार शेतात फिरविण्याची गरज नाही. विशेष म्हणजे पावसाळ्यात ताराला हिरवळ लागल्यास बॅटरी डिसचार्ज होण्याची समस्या असते मात्र या मशिनमध्ये ही समस्या येत नाही.
मोबाईलवरूनच करा शेतीचे रक्षण
RN सोलर सिस्टीम व ईलेक्ट्रॉनिक्समध्ये इतर शेतीपयोगी असेसरीज देखील उपलब्ध आहेत. यात एक महत्त्वाची असेसरी म्हणजे सोलर कॅमेरा. अलिकडच्या काळात शेतक-यांना चोरी, पीक नाश, अतिक्रमण यासारख्या आव्हानांना शेतक-यांना तोंड द्यावे लागते. या समस्या केवळ त्यांच्या दैनंदिन कामकाजात व्यत्यय आणत नाहीत तर त्यांच्या उपजीविकेला थेट धोका निर्माण करतात. शेती जमीन सुरक्षित करणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे शेतक-यांसाठी आता सोलर कॅमरा उपलब्ध करून दिला जात आहे. त्यामुळे शेतक-यांना आता घरबसल्याच मोबाईलवरून शेतीची राखण करता येणार आहे. त्यामुळे एकदा अवश्य सोलर कॅमेराचा डेमो घ्या, असे आवाहन करण्यात आले आहे. या असेसरीसह पेरणी यंत्र, बार्किंग डॉग, टॉर्च, फवारणी यंत्र इत्यादी असेसरीज देखील अगदी वाजवी दरात उपलब्ध आहेत.
डेमोसाठी संपर्क साधू शकता: संचालक
सदर मशिनचा आम्ही डेमो उपलब्ध करून दिला आहे. केवळ एका कॉलवर तुम्हाला या मशिनचा डेमो दिला जाईल. आम्ही अधिकृत डिलर असल्याने ग्राहकांना अत्यल्प दरात मशिन मिळते. याशिवाय ठोक तसेच चिल्लर विक्रीही केली जाते. ज्या शेतक-यांना मशिनन एक्सचेंज करायची आहे त्यांना एक्सचेंज देखील करता येणार आहे. अधिक माहितीसाठी एकदा आमच्या वरोरा रोडवरील नगर परिषदेच्या कॉम्प्लेमधील प्रतिष्ठानाला भेट द्यावी,
– निकेश निब्रड, संचालक आर ऍन्ड एन सोलर सिस्टिम ऍन्ड इलेक्ट्रॉनिक्स
पत्ता: नगर परिषद कॉम्प्लेक्स, ब्लॉक नं. 38, वरोरा रोड, ओरिजिन कॉम्प्युटरच्या बाजुला, वणी
अधिक माहितीसाठी संपर्क: निकेश निब्रड – 9767816735 व 8999952507



Comments are closed.