राजूर येथे एका इसमाचा गळफास

बहुगुणी डेस्क, वणी: तालुक्यातील राजूर येथील एका इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केली. शनिवारी सकाळी 6 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. रियाज अहमद वाट्या शाह (41) असे मृतकाचे नाव आहे. घटना उघडकीस येताच याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलीस घटनास्थळी पोहोचले व घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. रियाजने आत्महत्या का केली याचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. मृतक रियाजच्या पश्चात पत्नी व पाच मुलं आहेत. प्रकरणाचा तपास वणी पोलीस करीत आहे.

Comments are closed.