एसटीत शाळकरी मुलीचा विनयभंग, मोबाईलने फोडले आरोपीचे बिंग

मोबाईलवरच्या फोटोवरून आरोपीची पटली ओळख

0

सुशील ओझा,झरी: एका 14 वर्षीय शाळकरी मुलीचा एसटीमध्ये विनयभंग केल्या प्रकरणी एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचे नाव अमोल ताडूरवार (30) रा. मुकुटबन असून पोलिसांनी तात्काळ या विकृताच्या मुसक्या आळल्या. मुलीचा विनयभंग व छेड काढल्या प्रकरणी आरोपीवर विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

तक्रारीनुसार, पीडित मुलगी ही मुकुटबन येथील एका शाळेत 9 व्या वर्गात आहे. ती रोज मुकुटबनला शिक्षणासाठी तिच्या गावाहून एसटीने येते. बुधवारी 20 जानेवारीला ती सकाळी सव्वा 9 वाजताच्या दरम्यान शाळेसाठी एसटीमध्ये बसली. बसमध्ये दुस-या सिटवर मुलीचा क्लासमेट बसला होता. थोड्या अंतरावर बस गेल्यानंतर त्याच शाळेतील आणखी एक विद्यार्थी बसला. सकाळची वेळ असल्याने बसमध्ये जास्त प्रवासी नव्हते.

दरम्यान मुलगी तिकीट काढण्यासाठी गेली असता ड्रायव्हरच्या बाजुला असलेल्या सिंगल सिटवर एक तरुण बसला होता. पीडित मुलगी तिकीट काढायला जाताच त्या तरुणाने मुलीचा मोबाईलने फोटो काढला. सदर प्रकारामुळे मुलगी घाबरली व आपल्या सिटवर जाऊन बसली. त्यावर तरुणाने मुलीच्या सीटवर येऊन बसण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे घाबरलेल्या मुलीने बाजुच्या सिटवर आपली स्कुलबॅग ठेवली.

मुलीने बाजुच्या सिटवर स्कूलबॅग ठेवल्याने तरुणाचे मनसुबे उधळले गेले. तो तिच्या शेजारच्या सिटवर बसला व तिथून मुलीकडे एकटक वाईट नजरेने बघत होता. काही वेळाने त्याने मुलीकडे बघून अश्लिल इशारे करणे सुरू केले व मुलीला आवाज देऊ लागला. सदर प्रकाराने मुलगी आणखीनच घाबरली.

आरोपीचा मोबाईल वर काढला फोटो
तरुणाचे कृत्य थांबताना दिसत नसल्याने मुलीने हिम्मत करून छेड काढणा-या तरुणाचा मोबाईलवर फोटो काढला. फोटो काढतताच तरुणाची घाबरली व तो शांत झाला. काही वेळाने बस मुकुटबन येथे पोहोचली. सदर मुलगी व शाळेतील क्लासमेटसह ती शाळेत गेली व आपले शिक्षक व मुख्याध्यापकास घडलेली घटना सांगितली.

मोबाईलच्या फोटोवरून पटली ओळख
मुलीने शिक्षकांना व मुख्याध्यापकांना छेड काढणा-या तरुणाचा मोबाईलवर काढलेला फोटो दाखवला. शिक्षकांनी फोटो बघताच मुलाला ओळखले. एक दोन जणांना विचारून त्यांनी खात्रीही करून घेतली असता सदर छेड काढणारा तरुण हा अमोल ताडूरवार (30) रा. मुकुटबन असल्याची ओळख पटली. शिक्षकांनी मुलीला धीर दिला व शाळा संपल्यावर तिला गावी घरी सोडून दिले.

घरी गेल्यावर तिने घडलेला सर्व प्रकार तिच्या मामीला सांगितला. मामीने तिचे आजी आजी आजोबा येताच त्यांना हा प्रकार सांगितला. तिच्या पालकांनी याबाबत पोलिसात तक्रार करण्याचे ठरवले व ते संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास मुकुटबन पोलीस स्टेशन येथे तक्रार देण्यास पोहोचले.

तक्रारीवरून आरोपी अमोल ताडूरवार वय अंदाचे 30 वर्ष याच्याविरुद्ध भादंविच्या कलम 354 (अ)(1)(3) सह कलम बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक अत्याचार कायदा कलम 12 अंतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखत आरोपीला तात्काळ अटक केली.

आरोपीला आज न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याची रवानगी कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. प्रकरणाचा तपास ठाणेदार धर्मा सोनुने यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक युवराज राठोड व जमादार प्रवीण ताडकोकुलवार करीत आहे.

हे देखील वाचा: 

केवळ दीड हजारात सीसीटीव्ही कॅमेरा सेटअप

फेसबुकवरून झाला ‘प्यार’, संधी मिळताच केला अत्याचार

Leave A Reply

Your email address will not be published.