वणीत आज शिवसेनेच्या वतीने धरणे आंदोलन,

उपविभागीय अधिकारी यांना विविध मागण्यांचे दिले निवेदन,

0

पुरुषोत्तम नवघरे, वणी: गुरुवार दिनांक 21 जानेवारीला शिवसेनेच्या वतीने तहसील कार्यालयासमोर विविध मागण्यांसंदर्भात धरणे आंदोलन करण्यात आले. विविध मागण्याचे निवेदन उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे यांना देण्यात आले.

शिंदोला येथे ग्रामीण रुग्णालय झाले पाहिजे. वणी नगर परिषदेमध्ये झालेल्या पाणी कर वसुलीत 14 लक्ष 35 हजारांची अफरातफर प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी. शहरातील वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करण्यात यावी.

मुकुटबन फाटा ते वरोरा रेल्वे सायडिंग 4 कोटी 85 लक्ष रुपयांचे काम दोन वर्षांपूर्वी अतिशय नित्कृष्ठ दर्जाचे झालेल्या कामाची चौकशी करण्यात येऊन कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्यात यावे. इत्यादी मागण्यांसाठी उपविभागीय कार्यालय वणी समोर धरणे आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख संजय निखाडे, शिवसेनेचे संजय देरकर, शिवसेना शहर प्रमुख राजू तुराणकर, दीपक कोकास माजी उपजिल्हा प्रमुख, मुन्ना बोथरा, ललित लांजेवार,अजिंक्य शेंडे, सुरेश देशकर यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

हेदेखील वाचा

एसटीत शाळकरी मुलीचा विनयभंग, मोबाईलने फोडले आरोपीचे बिंग

हेदेखील वाचा

फेसबुकवरून झाला ‘प्यार’, संधी मिळताच केला अत्याचार

Leave A Reply

Your email address will not be published.