वणी तालुक्यातील एक व्यक्ती सावंगी (मेघे) येथे पॉजिटिव्ह

तालुक्यातील दुसरे कोविड केअर सेन्टर कधी सुरू होणार?

0

जब्बार चीनी, वणी: काल संध्याकाळी 17 रुग्ण आढळल्यानंतर रात्री उशिरा तालुक्यातील ग्रामीण भागातील एक व्यक्ती सावंगी (मेघे) वर्धा येथे पॉजिटिव्ह आल्याची माहिती आहे. सदर रुग्ण वगळून सध्या वणी तालुक्यात 148 पॉजटिव्ह रुग्ण आढळले आहेत. दिवसेंदिवस झपाट्याने वाढत चाललेली रुग्णसंख्या ही एक चिंतेची बाब ठरत असून दुसरे कोविड केअर सेन्टरबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

वणीपासून कोरपना रोडवर असलेले सावंगी (नायगाव) येथील एक तरुणाची सावंगी (मेघे) वर्धा येथे गेल्या एक वर्षांपासून ट्रिटमेन्ट सुरू आहे. सदर व्यक्ती काल वणीवरून उपचारासाठी सावंगी येथे बाईकने एकटाच गेला होता. उपचाराआधी सदर तरुणाची रॅपिड ऍन्टिजन टेस्ट करण्यात आली. यात हा तरुण पॉजिटिव्ह आढळून आला आहे.

सावंगी (नायगाव) येथील तरुण पॉजिटिव्ह निघताच रात्री याची माहिती वर्धा जिल्हा प्रशासनाने स्थानिक प्रशासनाला दिली. त्यावरून स्थानिक प्रशासनाने पुढच्या प्रक्रियेला सुरूवात केली आहे. त्या व्यक्तीच्या संपर्कात येणा-या व्यक्तींना ट्रेस करण्यात येत असून त्यांना कॉरन्टाईन करून त्यांची टेस्ट घेतली जाणार आहे. विशेष म्हणजे सदर तरुणामध्ये कोरोनाचे कोणतेही लक्षणं नाहीत.

सदर तरुण हा चंद्रपूर येथे नोकरीला होता. त्यामुळे तरुणाचे चंद्रपूर तसेच वणी येथे जाणे येणे सुरु असायचे. मात्र ती व्यक्ती कोणत्याही आजारी व्यक्तीच्या संपर्कात आली नाही शिवाय या तरुणाच्या संपर्कातील कुणीही व्यक्ती पॉजिटिव्ह नसल्याची माहिती आहे.

दुसरे कोविड केअर सेन्टर कधी सुरू होणार?
शहरात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहे. कोविड केअर सेन्टर रुग्णांमुळे भरले आहे. तसेच इथे मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याचा आरोपही रुग्णांनी केला आहे. स्वच्छतेबाबत इथे अधिकाधिक तक्रारी आहेत. पाणी साचून राहणे व स्वच्छतागृह घाणेरडे असल्याच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी करण्यात आल्या होत्या. याबाबत सोशल मीडियात व्हिडीओ देखील व्हायरल करण्यात आले होता.

सततचे वाढत जाणारे रुग्ण यामुळे लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिका-यांनी दुसरे कोविड केअर सेन्टर सुरू करण्याबाबत बैठक घेतली होती. मात्र त्याचे पुढे काय झाले हे कळू शकले नाही. यात नांदेपेरा रोडवरील एक शाळा व वरोरा रोड येथील एका कॉलेजमध्ये दुसरे कोविड केअर सेन्टर सुरू करण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे.

अपंग निवासी शाळा होणार कोविड केअर सेन्टर – आ. संजीवरेड्डी बोदकुरवार
वणीत रुग्णाचा आकडा वाढल्यानंतर आम्ही खबरदारी म्हणून दुस-या कोविड केअर सेन्टरबाबत बैठक घेऊन याबाबत चर्चा केली होती. मात्र त्यानंतर शहरातील रुग्णसंख्या कमी होऊन केवळ 5-6 व्यक्तीच ऍक्टिव्ह होते. त्यामुळे हा विषय़ मागे राहिला. मात्र आता पुन्हा रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने खबरदारी म्हणून आम्ही वागदरा रोडवरील अपंग निवासी शाळा कोविड केअर सेन्टर म्हणून निवडली आहे. यात 40 बेडची व्यवस्था करण्यात  येणार आहे. 
– संजीवरेड्डी बोदकुरवार, आमदार वणी विधानसभा

काल वणी शहरात 15 व ग्रामीण भागात 2 रुग्ण आढळले होते. यात सिंधी कॉलनी येथील 5, ब्राह्मणी रोड स्थित काळे ले आऊट येथे 2, पटवारी कॉलनी (लालगुडा) येथे 2, जत्रा रोड 1, रंगनाथ नगर 1, रविनगर 1, एस बी परिसर (विठ्ठलवाडी) 1, रंगारी पुरा 1, जैन ले आऊट येथे 1 रुग्ण आढळून आले आहेत. तर ग्रामीण भागात उकणी येथे 1 व भालर येथील 1 पॉजिटिव्ह आढळून आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.