यवतमाळ रोडवरील रेस्टॉरन्टसमोरून दुचाकी लंपास

सावधान.... रेस्टॉरन्ट समोर दुचाकी लावत असाल तर...

विवेक तोटेवार, वणी: एका रेस्टॉरन्टच्या बाजूला ठेवलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने लंपास केली. सोमवारी ही घटना घडली. आशिष देठे असे दुचाकी मालकाचे नाव आहे. शहरात वारंवार दुचाकी चोरीच्या घटना घडत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

आशिष देठे (27) हा जैन ले आऊट येथील रहिवासी असून तो खासगी चालक म्हणून काम करतो. त्याने 2012 मध्ये काळ्या रंगाची एक पॅशन प्रो (MH 29 AF 8378) ही दुचाकी घेतली होती. सोमवारी दिनांक 8 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजताच्या सुमारास त्याने यवतमाळ रोडवर नंदिनी नामक रेस्टॉरन्टबाजूला असलेल्या मोकळ्या जागेत दुचाकी ठेवली होती. त्यानंतर तो नांदेपेरा येथे कामानिमित्त गेला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

4 वाजता परत आल्यवर त्याला सदर ठिकाणी दुचाकी आढळून आली नाही. त्यामुळे त्याने आजूबाजूला याबाबत विचारणा केली असता त्याला कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर दुचाकी चोरी गेल्याची खात्री झाल्यावर त्याने वणी पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात भादंविच्या कलम 379 नुसार गुन्हा दाखल केला. प्रकरणाचा तपास वणी पोलीस करीत आहे

Comments are closed.