ट्रकची दुचाकीला जबर धडक, युवक जागीच ठार

वर्षाचा शेवटचा दिवस ठरला दुःखद, राजूर गावात शोककळा

0

जितेंद्र कोठारी, वणी: वणी-घुग्गुस राज्यमार्गावर मंदर गावाजवळ एका ट्रकने एका दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात मोटरसायकलस्वार युवक जागीच ठार झाला. ही घटना आज गुरुवारी दिनांक 31 डिसें. रोजी दुपारी 2.30 वाजताच्या दरम्यान घडली. दिनेश शंकर कंडे (वय 28 वर्ष) रा. राजूर (कॉलरी) असे ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. अपघातानंतर ट्रकचालक ट्रक सोडून पसार झाला. मावळत्या वर्षाचा शेवटचा दिवस ठरला दुःखद ठरल्याने राजूर गावावर शोककळा पसरली आहे.

Podar School 2025

प्राप्त माहितीनुसार राजूर (कॉलरी) ता. वणी येथील दिनेश शंकर कंडे हा युवक कामानिमित्त आपल्या दुचाकीने (MH 29 Z 5099) चंद्रपूरकडे जात होता. दरम्यान वणी येथून 3 कि.मी. अंतरावर मंदर गावाजवळ भरधाव येत असलेल्या चढ्ढा ट्रान्सपोर्ट कंपनीच्या सिमेंट वाहतूक करणारा एक ट्रक त्याच दिशेने भरधाव जात होता. भरधाव ट्रकने दिनेशच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. अपघातात दिनेशच्या डोक्याला जबर मार लागून तो जागीच गतप्राण झाला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

अपघाताची माहिती मिळताच वणी पोलीस घटनास्थळी पोहचले. मात्र ट्रक चालक दुर्घटनेनंतर ट्रक सोडून पसार झाला होता. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह पोस्टमार्टमसाठी वणी ग्रामीण रुग्णालयात पाठविला. पोलिसांनी ट्रक (MH34 AB 8978) जप्त करून अज्ञात ट्रक चालकविरुद्द कलम 269 व 304 (अ) अनव्ये गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास जमादार जगदीश बोरनारे करीत आहे.

हे देखील वाचा:

हे देखील वाचा:

भालर येथे वाघाच्या हल्ल्यात 4 गायी, 1 बैल ठार

Leave A Reply

Your email address will not be published.