आमदार व जिल्हा परिषद सदस्यांच्या प्रयत्नातून १ कोटींचा विकासनिधी मंजूर
माथार्जुन गणात नळयोजना, पाण्याची टाकी व रस्त्याचे भूमीपूजन
सुशील ओझा, झरी: तालुक्यातील माथार्जुन गणात आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार व जिल्हा परिषद सदस्य मीनाक्षी बोलेनवार यांच्या पर्यंतनातून ९७ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून विकास कामांचे थाटात भूमिपूजन सर्वच कामे सुरू झाली आहे. दिनांक १ सप्टेंबर रोजी झरी तालुक्यातील माथार्जुन पंचायत समिती गणात जिल्हा परिषद नळ पाणी पुरवठा योजनेचा भूमिपूजन सोहळा पार पडला.
ग्रा.पं. करिता पाण्याची टाकी व नळ योजनासाठी निधी रू. ४०.१८ लक्ष रुपये मंजुर करण्यात आले. गट ग्रा.पं. चिखलडोह अतंर्गत कुंडी येथे पाण्याची टाकी व नळ योजनासाठी निधी रू. २१. ९८ लक्ष रुपये मंजुर करण्यात आले. गट ग्रा.पं. पाढरवाणी अंतर्गंत दुभाटी येथे पाण्याची टाकी व नळ योजनासाठी निधी रू. १५.३६ लक्ष रुपये मंजुर करण्यात आले. ग्रा.पं. मांडवा येथे पाण्याची टाकी व नळ योजनासाठी निधी रू. १६.२० लक्ष रुपये मंजुर करण्यात आले.
वसंतराव नाईक सुधार योजना २०१७ – १८ मौजा मांडवा येथे सिमेंट काँक्रीट रस्ता निधी रू. ३.०० लक्ष रुपये मंजुर करण्यात आले. भूमीपूजनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन हंसराज अहिर केंद्रीय गृहराज्यमंत्री होते. तर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणुन आ. संजीवरेड्डी बोदकुरवार होते.
या कार्यक्रमाला दिनकर पावडे महामंत्री यवतमाळ जिल्हा, लताताई आत्राम सभापती पं.स.झरी, मिनाक्षी सुरेश बोलेनवार जि.प.सदस्या, संगीताताई सुरेश मानकर जि.प.सदस्या, राजेश्वर गोंड्रावार सदस्य पं.स.(माथार्जुन गण)झरी, अनिल पोटे अध्यक्ष भाजपा, अनिल पावडे माजी कृ.उ.बा.स. झरी, धर्मा आत्राम माजी जि.प. सदस्य, भाऊरावजी मेश्राम माजी सभापती पं.स. झरी यांची प्रमुख उपस्थिती होती. यांच्यासोबतच सोहळ्याला गावातील सरपंच, उपसरपंच, सदस्य, व तालुक्यातील व गावातील नागरिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.