आरो प्लान्टमध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार ?

3.5 लाखांचा प्लान्ट 7 लाख 40 हजारात

0

सुशील ओझा, झरी: ग्रामीण भागातील जनतेला शुद्ध पाणी मिळावे याकरिता प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये ५०० ते १ हजार लिटरची क्षमता असलेले वॉटर फिल्टर लावण्याचे आदेश आहे. त्यानुसार सध्या आरो प्लॉन्ट लावण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र यात मोठ्या प्रमाणात घोळ होत असल्याचे दिसून येत आहे. यात तालुक्यातील काही राजकीय ठेकेदार वरचढ झाले असून प्रत्येक कामाचे ठेके स्वतःच घेत असल्याचेही समोर येत आहे.

खनिज विकास निधीतून प्रत्येक ग्रामपंचायतीला आरो प्लान्ट करिता तालुका पातळीवर टेंडर काढले जाते. परंतु तालुक्यातील टेंडर राजकीय पातळीवर म्यानेज करून तालुक्यात आरो प्लांट मोठ्या प्रमाणात लावण्यात येत आहे. नियमाने आरो प्लांट करिता १० बाय १५ चा शेड ५०० लिटरच्या क्षमतेच्या फिल्टर प्लांट करिता उभारावे लागते. परंतु अनेक ठिकाणी कमी लांबी रुंदीचा शेड उभारण्यात आले असल्याची माहिती आहे. तसेच वॉटर फिल्टर मध्ये कोणत्या उत्कृष्ट (isi) मार्क मान्यताप्राप्त कंपनीची मोटर, मेमरण, वेसल, डोजिंग पंप वापरण्याच्या ऐवजी लोकल कंपनीची कमी किमतीचे साहित्य वापरण्यात आल्याची माहिती आहे.

इस्टिमेट नुसार फिल्टर मशीन मध्ये सहसा सी.आर.आय किंवा टेक्समो कंपनीची सामान वापरले जाते. परंतु या कंपनीचे सामान वापरण्यात आले नसल्याची माहिती आहे. आरो प्लांट शेड व इतर वस्तुसह ३ लाख २० हजारात बसणाऱ्याची किंमत ७ लाख ४० हजारात बसवत असून प्रत्येक आरो प्लांट मागे सदर ठेकेदार ३ लाख ८० हजार कमवीत आहे. १० बाय १० च्या प्लांट शेडची किंमत ७० हजार, ५०० लिटर आरोची किंमत १ लाख १० हजार, कुलिंग (ac) मशीन ६५ हजार व इतर साहित्य अशी किंमत काढली तरी ही किंमत तीन साडेतीन लाखांच्या वर जात नाही. मात्र त्यातही लोकल कंपनीचे वरील वस्तू वापरून व १० बाय १० च्या शेड ऐवजी ५ बाय १० चे शेड उभे करून त्यातही भ्रष्टचार केल्याची ओरड आहे.

आरो प्लांट गावकऱ्यांना शुद्ध पाणी मिळावे या करिता बसविले जाते परंतु अश्या भ्रष्टाचारी ठेकेदारामुळे सदर प्लांट दोन महिन्यातच बंद पडण्याची भीती निर्माण झाली आहे. सदर ठेकेदारानी तालुक्यात विविध ठिकाणी १२ आरो प्लांट बसविले असून अजून मोठ्या प्रमाणात आरो प्लांट बसविण्याच्या तयारीत आहे. तसेच या पूर्वीही पुष्कळ आरो प्लांट लावून अनेकांनी लाखो रुपये उकळल्याची माहिती समोर आली आहे. तालुक्यात ५५ ग्रामपंचायत असून अनेक ठिकाणी आरो फिल्टर लावण्याची तयारी शासनाची असून तालुक्यातील १०६ आरो प्लांट चे टेंडर अजून लागणार असल्याची माहिती आहे.

या टेंडरवरही याच राजकीय ठेकेदारांचा डोळा आहे. आपल्या जवळील राजकीय लोकप्रतिनिधींकडून हे टेंडरसुद्धा ओढऊन घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. नियम व इस्टिमेट नुसार तालुक्यात बसविलेल्या आरो प्लांटचे मेंटनस कुणाकडे दिले मेंटनस दिलेल्या व्यक्ती कडून हमीपत्र लिहून घेतले का किंवा डिपॉजित ( सेक्युरेटी) जमा केले का ? ठेकेदाराने सेक्युरिटी जमा केली नसेल तर आरो फिल्टरचे मेंटनेन्स करणार काय ? मेंटनेन्स न केल्यास आरो प्लांट बंद होणार असाही प्रश्न उपस्थित होत आहे. सदर ठेकेदार (iso) असणे म्हणजेच अधीकृत व नामांकित आहे का ? ठेकेदारांची ब्यालेन्स सीट किती रुपयाची मागितली जर ब्यांलेन्स सीट मागितली नसेल तर एवढा मोठा टेंडर कसा काय मिळाला ? असे अनेक प्रश्न उपस्थित होत असून सदर कामात मोठी हेराफेरी होऊन ही कामे तर मिळाली नाही ना असाही प्रश्न उपस्तीत होत आहे.

तालुक्यासह इतर तालुके व जिल्ह्यात आश्रम शाळा, शासकीय वसतिगृह व इतर ठिकाणी शेकडो वॉटर फिल्टर ३ लाख ३० हजारात लावण्यात आले मग तालुक्यातील वॉटर फिल्टर ७ लाख ४० हजारात कसे ? हे एक कोडेच आहे. आरो फिल्टर च्या कामात सदर ठेकेदारांनी ५० लाखाच्यावर माया गोळा केली असून सदर ठेकेदाराबाबत तालुक्यात प्रचंड संताप व्यक्त केल्या जात आहे. तालुक्यात आजपर्यंत बसविण्यात आलेल्या आरो प्लांट ची सखोल चौकशी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी करून भ्रष्टाचारी ठेकेदारावर कार्यवाही व्हावी अशी मागणी होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.