प्रयास इंग्लिश मीडियम स्कूलचे चार विद्यार्थी स्कॉलरशीपसाठी पात्र

परिसराता विद्यार्थ्यांवर कौतुकाचा वर्षाव

0 546

बहुगुणी डेस्क, वणी: कायर येथील प्रयास इंग्लिश मीडियम स्कूल येथील चार विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत प्राविण्य मिळवून शिष्यवृत्तीसाठी पात्र झाले आहेत. यात वर्ग पाचचे दोन विद्यार्थी व वर्ग आठच्या दोन विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यात पाचव्या वर्गात शिकत असलेली कु. नताशा प्रकाश बेसरकर व प्रणव संदीप गारघाडे तर आठव्या वर्गातील पूजा विनोद किनाके व संयुक्ता राजेंद्र सोनेकर यांचा समावेश आहेत.

त्यांच्या या यशाबद्दल शाळेच्या वतीने नुकताच त्याचे एका छोटेखानी कार्यक्रमात शिल्ड देऊन अभिनंदन करण्यात आले. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सुनिता काळे, संस्थेचे सचिव जितेंद्र काळे, उपमुख्याध्यापक शिवशंकर नांदे, अतुल पंधरे, गुणरत्न आवारी, दीपक कोवे, शंकर घुगरे, बळवंत जुमनाके, शेखर मत्ते, सपना बसरकर, कल्याणी गाऊत्रे, हर्षाली मोहितकर, टीना मुळेवार, रुपाली ठावली यांच्यासह शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.

Comments
Loading...