आठवडी बाजार वसुली रकमेची लाखो रुपयांची अफरातफर

0

मारेगाव: मारेगाव नगरपंचायतने कंत्राटी तत्वावर वसुलीसाठी आठवडी बाजार दिला आहे. त्या आठवडी बाजारातून येणारी वसुली दर मंगळवारी ठरल्या प्रमाणे १३ हजार रुपये ठेकेदारा मार्फत नगरपंचायतीमध्ये रितसर पावती घेऊन भरण्यात येतात. परंतु या वसुलीच्या रकमेत लाखो रुपयांची अफरातफर झाल्याचे समोर आले आहे. नगरपंचायतचे नगरसेवक व विरोधी पक्षनेते उदय रायपुरे यांनी नगरपंचायतीला या संदर्भात पत्र देऊन विचारणा केली असता ही बाब समोर आली आहे. त्याची सखोल चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याची मागणी नगरसेवक उदय रायपुरे यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

मारेगाव येथे तालुक्यातील सर्वात मोठा आठवडी बाजार भरतो. दर आठवडी बाजारातून हजारो रूपयांची कर वसुली होते. ठेकेदारा मार्फत दर बाजाराच्या वसुलीतुन नगरपंचायत मारेगावला करारानुसार १३ हजार रुपये देणे असते. बाजाराच्या कर वसुलीचा हर्रास झाला तेव्हा पासून दि.३/३/२०१८ पर्यंत ४२ हप्ते होतात. त्याची रक्कम ५ लाख ४६ हजार रुपये होते. ही रक्कम नगरपंचायत रजिस्टरवर रहायला पाहिजे होती. मात्र ३/३/२०१८ पर्यंत केवळ २ लाख ५०० रुपयेच वसुली दाखवली गेली आहे.

याबाबत बाजार ठेकेदाराला नगरसेवक उदय रायपुरे यांनी विचारना केली असता त्यांनी संपूर्ण हप्ते भरल्याच सांगितले. महत्त्वाचं म्हणजे काही हप्त्याच्या पावत्या नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी दिल्या नाही असेही त्यांनी सांगितले. नगरपंचायत कर्मचारी यांनी बाजार वसुलीचे पैसे आपल्या घरी ठेवले. जेव्हा हे प्रकरण बाहेर आले तेव्हा १ लाख ३० हजार रुपये भरल्याचे समोर आले आहे. त्यामुळे यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचे तक्राकर्त्यांचे म्हणणे आहे. बाजाराची वसुलीची रक्कम कोणाकोणा कडे भरली ही बाब अद्याप गुलदस्त्यात आहे. जनतेच्या पैशाची होत असलेली उधळपट्टी रोखण्यासाठी नगरसेवक उदय रायपुरे यांनी जिल्हाधिकारी यवतमाळ यांचे कडे लेखी तक्रार केली,त्या तक्रारीची दखल जिल्हाधिकारी यांनी घेऊन न्याय देण्याची मागणी होत आहे,

Leave A Reply

Your email address will not be published.