मोफत अबॅकस कार्यशाळा (समर क्लास) 1 एप्रिलपासून सुरू

महालक्ष्मी अकॅडमीचा उपक्रम, केवळ प्रथम नोंदणी करणा-यांनाच प्रवेश

पुरुषोत्तम नवघरे, वणी: आपली लेकरं हुशार आहेतच. परंतु अबॅकस या टेक्नॉलॉजी मुळे ते अधिक स्मार्ट होतील. म्हणूनच त्यांच्यासाठी उन्हाळी सुटीनिमित्त मोफत कार्यशाळा आयोजित केली आहे. 1 एप्रिल ते 3 एप्रिल पर्यंत ही मोफत कार्यशाळा होणार आहे. कार्यशाळेत प्रथम नाव नोंदणी करणा-यांना प्रवेश दिला जाणार आहे. वय वर्ष 5 ते 14 वर्षे वयोगटातील विद्यार्थी यात सहभागी होऊ शकतात. 31 मार्च ही नोंदणीची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर नोंदणी करावी, असे आवाहन आयोजक महालक्ष्मी अकॅडमीने केले आहे. 

या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांच्या एकाग्रतेत वाढ होते. त्यांच्या स्मरणक्षमतेला चालना मिळते. सोबतच वैचारिक क्षमतेत वाढदेखील होते. अबॅकसमुळे बौद्धिक विकास होतो. सर्व विद्यार्थ्यांना अत्यंत अवघड वाटणारा गणित विषय सोपा होतो. छोट्या छोट्या ट्रिक्सने गणिते करण्याचा वेग वाढतो. त्यांच्या कल्पनाशक्तीचा विकास होतो. ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास बळावतो.

अबॅकस हे दोनच तंत्रज्ञान आहे. विद्यार्थ्यांना अबॅकस म्हणजे काय आणि त्याचे फायदे काय हे कार्यशाळेत शिकवले जाईल. कठीणातल्या कठीण गणिताच्या पद्धती अगदी सोप्या करून यात शिकवल्या जातात. ही कार्यशाळा श्रीकृष्ण भवन, सिद्धिविनायक मॅचिंग सेंटर जवळ, डॉक्टर तुगनायत हॉस्पिटल रोड येथे दुसऱ्या मजल्यावर होईल.

अधिक माहिती करता दिव्या अक्षय गोरंटीवार 7767894004 आणि एकता सुरेंद्र नालमवार 9340023697 यांच्याशी संपर्क साधावा, अशी विनंती कार्यशाळेच्या आयोजकांनी केली आहे.

Comments are closed.