आपल्या हुशार लेकरांना अधिक स्मार्ट करा

महालक्ष्मी अबॅकस अकॅडमीची मोफत कार्यशाळा 22 मार्चपासून

पुरुषोत्तम नवघरे, वणी: आपली लेकरं हुशार आहेतच. परंतु अबॅकस या टेक्नॉलॉजी मुळे ते अधिक स्मार्ट होतील. म्हणूनच त्यांच्यासाठी 22 मार्चपासून मोफत कार्यशाळा आयोजित केली आहे. ही कार्यशाळा 22 ते 24 मार्च पर्यंत चालेल. नाव नोंदणी करण्याची अंतिम तारीख 21 मार्च असेल. 5 ते 14 वर्षे वयोगटातील विद्यार्थी यात सहभागी होऊ शकतात. या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांच्या एकाग्रतेत वाढ होते. त्यांच्या स्मरणक्षमतेला चालना मिळते. सोबतच वैचारिक क्षमतेत वाढदेखील होते. अबॅकसमुळे बौद्धिक विकास होतो. सर्व विद्यार्थ्यांना अत्यंत अवघड वाटणारा गणित विषय सोपा होतो. छोट्या छोट्या ट्रिक्सने गणिते करण्याचा वेग वाढतो. त्यांच्या कल्पनाशक्तीचा विकास होतो. ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास बळावतो.

अबॅकस हे दोनच तंत्रज्ञान आहे. विद्यार्थ्यांना अबॅकस म्हणजे काय आणि त्याचे फायदे काय हे कार्यशाळेत शिकवले जाईल. कठीणातल्या कठीण गणिताच्या पद्धती अगदी सोप्या करून यात शिकवल्या जातात. ही कार्यशाळा श्रीकृष्ण भवन, सिद्धिविनायक मॅचिंग सेंटर जवळ, डॉक्टर तुगनायत हॉस्पिटल रोड येथे दुसऱ्या मजल्यावर होईल. अधिक माहिती करता दिव्या अक्षय गोरंटीवार (7767894004) आणि एकता सुरेंद्र नालमवार (9340023697) यांच्याशी संपर्क साधावा, अशी विनंती कार्यशाळेच्या आयोजकांनी केली आहे.

Comments are closed.