बहुगुणी डेस्क, वणी: पिंपळगाव CHP येथे कोळसा उतरवताना ट्रकचा अपघात झाल्याने ड्रायव्हरचा मृत्यू झाला. ही घटना 23 ऑक्टोबर रोजी दुपारी साडे दीड वाजता घडली. मृत ड्रायव्हरचे नाव सतिश विठ्ठल बावणे (वय 34, रा. माजरी, ता. भद्रावती, जिल्हा चंद्रपूर) असे आहे. हँडब्रेक न लावल्याने मागे येत असलेला ट्रक थांबवताना ही दुर्दैवी घटना घडली.
प्राप्त माहितीनुसार, मृतक सतिश हा किशोर कुमार ट्रान्सपोर्ट कंपनीच्या (MH 40 AK 1242) या ट्रकचा ड्रायव्हर होता. ट्रक मालक मनोहर कुडे (रा. उमरेड, ता. नागपूर) यांच्याकडे हा ट्रक अटॅच होता. सतिशला सकाळी कोळसा भरून घेण्याचे सांगितले होते. मात्र, गाडी सुरू न झाल्याने त्याने घाईगडबडीत चढावर गाडी लावली. हँडब्रेक न लावता पल्ला खोलल्याने गाडीतील वजनामुळे ती मागे सरकली.
गाडी थांबवण्याच्या प्रयत्नात सतिश कॅबिनकडे धावला. यावेळी त्याचा पॅन्ट गाडीच्या चाकाच्या व्हील बोल्टमध्ये अडकला आणि तो खाली पडला. गाडीचा लिफ्टर त्याच्या छातीवर व हातावर जोरात आदळला, यामुळे तो गंभीर जखमी झाला.
घटनेची माहिती मिळताच कंपनीचे सुपरवायजर (नाव ५९ वर्ष, रा. हैद्राबाद) आणि WCL कर्मचारी यांनी सतिशला तात्काळ वणी येथील एका खासगी दवाखान्यात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्याला चंद्रपूर येथे हलवले, परंतु रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे ट्रान्सपोर्ट कंपनीतील सावळागोंधळ पुढे आला आहे.



Comments are closed.