गमतीत म्हटले ‘बकरी चोरून खाऊ’, मात्र खाल्ला मार !

गमतीतून वाद वाढला, एकाची दुसऱ्याला काठीने मारहाण

बहुगुणी डेस्क, वणी: गमतीत केलेल्या बोलण्याचा राग मनात धरून शेजाऱ्यानेच लाकडी काठीने हल्ला केला. रासा (ता. वणी) येथे ही घटना 27 रोजी सकाळी 7 वाजता घडली. रमेश नामदेव ब्रडकर (वय 47, रा. रासा) असे जखमीचे नाव आहे तर डाव्या हातावर व राहुल अशोक राखुंडे (वय 30, रा. रासा) असे आरोपीचे नाव आहे.

तक्रारीनुसार, फिर्यादी रमेश हे मजुरी करतात व आरोपी राहुल हा त्यांच्या जुन्या घराशेजारी राहतो. दोघांमध्ये जनावरे बांधण्यावरून नेहमी वाद होतात. 27 ऑक्टोबर रोजी सकाळी गावातील एका पानठेल्यावर रमेश गेला होता. तिथे गणपत, प्रफुल्ल, गजानन गाडफाडे व राहुल उपस्थित होते. गमतीत रमेश म्हणाले, “आपण एक-दोन दिवसांनी चोरीच्या बकऱ्या खाण्यास जाऊ.” हे ऐकून राहुल संतापला.

घरी परतल्यावर राहुल थेट रमेशच्या घरासमोर येऊन ओरडला, “तू मला बकरी चोर म्हणाला! बाहेर ये, दाखवतो!” रमेश बाहेर आल्याबरोबर राहुलने लाकडी काठीने डाव्या हातावर व पासोडीवर जोरदार मारले. गजानन गाडफाडे यांनी मध्यस्थी करून भांडण थांबवले. राहुलने शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

जखमी झाल्याने रमेश घरी गेले. पत्नी संगीता व मुलगा आल्यानंतर त्यांनी घटना सांगितली. कुटुंबाला धोका वाटल्याने वणी पोलीस स्टेशनला पत्नीसह हजर राहून तक्रार दिली. वणी पोलिसांनी राहुल राखुंडेवर BNS कलम 118(2), 351(2)(3), 352 अंतर्गत गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.

Comments are closed.