दारुच्या पव्व्याने केला घात, अपघातात काच पोटात जाऊन तरुणाचा मृत्यू

गावी परत जाताना रस्त्यात म्हैस आडवी आल्याने दुचाकीचा अपघात

सुरेश पाचभाई, बोटोणी: मारेगावहून गावी परत जाणा-या दुचाकीसमोर अचानक म्हैस आडवी आली. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून दुचाकी खाली पडली. यात कमरेत ठेवलेले दारूचे पव्वे फुलटे व त्याचे काच पोटात गेल्याने चालकाचा मृत्यू झाला तर मागे बसलेला सहकारी गंभीर जखमी झाला. मारेगाव-वणी रोडवर शनिवारी दिनांक 25 डिसेंबर रोजी संध्याकाळी 6.30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. संतोष प्रभाकर सूर (28) असे मृतकाचे नाव आहे.

सविस्तर वृत्त असे की मृतक संतोष हा वेगाव येथील रहिवाशी होता. तो मिस्त्रीकाम करायचा. शनिवारी संतोष त्याचा मित्र गोलू टेकाम सोबत स्प्लेंडर या दुचाकीने (MH29 BU1546) मारेगाव येथे आला होता. संध्याकाळी ते देशी दारूचे पव्वे घेऊन दोघेही वेगाव येथे परत जात होते. दरम्यान वणी रोडवलील कला वाणिज्य महाविद्यालयाजवळ संतोषच्या दुचाकीसमोर एक म्हैस आडवी आली. त्यामुळे संतोषचे दुचाकीवरचे नियंत्रण सुटले व त्याची दुचाकी खाली पडली.

या अपघातात संतोषच्या कमरेत ठेवलेले दारूचे पव्वे फुटले व त्याचे काच संतोषच्या पोटात शिरले. त्यामुळे अति रक्तस्राव झाला. तर त्याचा मित्र गोलू हा गंभीर जखमी झाला. उपस्थित असलेल्या लोकांनी दोघांनाही ग्रामीण रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी संतोषला मृत घोषीत केले. गोलू हा गंभीर जखमी असून त्याला प्राथमिक उपचारानंतर चंद्रपूर येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे. घटनेचा तपास मारेगाव पोलीस करीत आहे. दोन वर्षाआधीही मारेगावमध्ये अशीच एक घटना घडली होती. या अपघातातही दारुच्या पव्व्याचे काच पोटात गेल्याने चालकाचा मृत्यू झाला होता. (येथे क्लिक करून तुम्हाला ही जुनी बातमी वाचता येईल.)

दुचाकीस्वारांनी हेलमेट वापरण्याचे आवाहन
काम, नोकरी, बाजार इत्यादी कारणांसाठी मोठ्या प्रमाणात लोक तालुक्याच्या ठिकाणी दुचाकीने येतात. तसेच अनेक लोक नोकरी व इतर कामांसाठी दुचाकीने परगावी जातात. अवजड वाहनांची रहदारी, खराब रस्ते किंवा वन्य प्राणी आडवे आल्याने अपघाताच्या घटना नित्याच्याच आहे. तालुक्यात एका महिन्यात अनेकांना अपघातामुळे जीव गमवावा लागतो. या अपघातात सर्वाधिक मृत्यू हे डोक्याला गंभीर ईजा झाल्याने होतात. अनेक तरुण तसेच घरातील कर्त्याधर्त्या व्यक्तींना डोक्यावर केवळ हेलमेट नसल्याने जीव गमवावा लागला आहे. तर दुसरीकडे फक्त डोक्यावर हेलमेट असल्याने अनेकांचा जीव वाचला आहे. त्यामुळे दुचाकी चालकांनी हेलमेटचा वापर करावा असे आवाहन ‘वणी बहुगुणी’तर्फे करण्यात येत आहे.

हे देखील वाचा:

सायकलीस्ट प्रणाली चिकाटे हिचे सोमवारी वणीत आगमण

मार्डी-खैरी रोडवर दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक, एक ठार तर एक गंभीर

केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनला जागा देण्यास आक्षेप नाही- आ. बोदकुरवार

Comments are closed.