ऑटो व दुचाकीचा भीषण अपघात, 2 ठार 6 जखमी

गाय आडवी आल्याने चालकाचे सुटले नियंत्रण

0

मारेगाव: मारेगाव शहरापासुन दोन किमी अंतरावर पोळ्याचा दिवशी सकाळी ९:१५ वाजता ऑटो आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. यात दुचाकीस्वार जागीच ठार झाले, तर ऑटोतील सहा जण जखमी आहे. जखमींची अवस्था गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी यवतमाळला हलवण्यात आले आहे.

प्राप्त माहिती नुसार दिनांक 30 ऑगस्ट 2019 रोजी बोटोणी कडून मारेगाव कडे ऑटो (MH 29, M.5284) प्रवासी घेऊन येत होता. मारेगाव जवळ विनायक कोटेक्स जिनिंग जवळ ऑटोच्या समोर मोकाट गाय आली. त्याच वेळी मारेगाव वरून दुचाकी (MH.29 K 3428) बोटोणीकडे जात होती. गायीला वाचवण्याच्या प्रयत्नात ऑटोने दुचाकीला जबर धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की यात दुचाकीचालक व मागे बसलेली व्यक्ती जागीच ठार झाली. तर ऑटो मधील चालकासह सहा जण गंभीर जखमी झाले आहे.

मृतकामध्ये तुळसीराम भिमा टेकाम (४५) रा. आवळगाव, संतोष नारायण मडावी (३८) आवळगाव, तर जखमीमध्ये अॅटोचालक अतुल रामदास मेश्राम (३९) बोटोणी, मारोती शिंदे (४०) बोटोणी, सुनिल भिमा तोटे (३०) बोटोणी, नीळकंठ टेकाम (३०) शिवनाळा, सुधाकर सूर्यभान वाघाडे (३०), बोटोणी, सुनिल बबन वखनोर (३०) बोटोणी यांचा समावेश आहे. घटनास्थळी मारेगाव येथील शेख शरीफ हे उपस्थित होते त्यांनी लगेच सरका-यांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी मारेगाव ग्रामीण रुग्नालयात आणले. तर जखमींची परिस्थिती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी यवतमाळला हलवण्यात आले आहे.

दारूच्या पव्वाने केला घात
दुचाकीस्वाराजवळ दारुचे पव्वे होते. अपघात होताच हे पव्वे फुटून त्याचे काच एका मृतकाच्या मेंदूत घुसले. उद्या पोळ्याची कर (बडगा) असल्याने त्यासाठी ही दारू नेत असल्याचा कयास लावण्यात येत आहे. अशा प्रकारचा अपघात मागील वर्षी पोळा सणाच्या दिवसी मांगरुळ जवळ घडला होता. त्यात सुद्धा दोन व्यक्तींचा मृत्यू झाला होता. घटनेचा तपास मारेगाव पोलीस स्टेशनचे पो.नि. दिलीप वडगावकर यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक उपनिरिक्षक नितिन बलिगवार करित आहे. ऐन सणाच्या दिवशी अशी दुःखद घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.