सुदैव: कारमधील एअरबॅगमुळे वाचला चालकाचा जीव

मारेगावजवळ भरधाव कार उलटली

जितेंद्र कोठारी, वणी: वणी यवतमाळ मार्गावर मारेगाव येथून काही किमी अंतरावर शिवनाळा फाट्याजवळ एक भरधाव कार 3 ते 4 पलटी खाऊन शेतात जाऊन पडली. सुदैवाने कारमधील एअरबॅग खुलल्यामुळे नांदेड येथील कृषी कंपनीच्या अधिकाऱ्याचे जीव वाचला. दुर्घटनेबाबत मारेगाव पोलिसांना माहिती देण्यात आली.

प्राप्त माहितीनुसार नांदेड येथील फोकस बायोटेक या कंपनीचे मार्केटिंग अधिकारी चांडक हे वणी येथून मार्केटिंगचे काम आटोपून टाटा टियगो (MH26BX0748) या कारने यवतमाळच्या दिशेने जात होते. दुपारी 3.30 वाजता दरम्यान मारेगाव येथून काही किलोमीटर अंतरावर शिवनाळा फाटाजवळ रस्त्यावर पडलेल्या एका मोठ्या गोट्यावर कारचा समोरील टायर चढल्यामुळे भरधाव कार 3 ते 4 पलटी खाऊन शेतात जाऊन पडली.

कार पलटी होताच कारमधील एअरबॅग ओपन झाले. त्यामुळे कार चालवीत असलेल्या चांडक नावाच्या अधिकाऱ्याला कोणत्याही प्रकारची इजा झाली नाही.दुर्घटनेबाबत मारेगाव पोलिसांना माहिती देण्यात आली असून पोलीस पुढील तपास करीत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.