मारेगावजवळ भीषण अपघात, 3 ठार 5 गंभीर

महांकालीचे दर्शन घेऊन परत येताना काळाचा घाला

0 3,426

ज्योतिबा पोटे, मारेगाव:मारेगावजवळ ट्रक आणि मॅक्स गाडीचा भीषण अपघात झाला. मंगळवारी मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. चंद्रपूर येथील महांकाली देवीचे दर्शन घेऊन आपल्या गावी परत जात असताना मारेगाव पासून एक किमी अंतरावर तुळशीराम रेस्टॉरंट जवळ हा अपघात झाला. या अपघातात 2 जण जागीच ठार झाले तर एक महिला जी नववधू होती तिला उपचारासाठी नागपूरला नेताना मृत्यू झाला.

प्राप्त माहिती नुसार हिंगोली जिल्यातील बाळापूर येथील रहिवासी चंद्रपूर येथे लग्नानंतर महांकाली देवीच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन परतीचा प्रवास करीत असताना मारेगाव येथील तुळशीराम रेस्टारंट जवळ यवतमाळ कडून चंद्रपूर कडे जाणाऱ्या अज्ञात ट्रकने टाटा मॅक्स (MH 34 K 2438) गाडीला जोरदार धडक दिली. यात टाटा मॅक्स गाडी रोड वरुन तीन पलटी खात रोडच्या साईडला गेली. हा अपघात इतका भीषण होता की यात 2  जण जागीच ठार झाले, तर 6 जण जखमी झाले.

मृतका मध्ये लक्ष्मीबाई भारत उपरे वय ६० वर्ष, सानिका किसन गोपाळे, वय २० वर्ष यांंचा जागीच तर साक्षी देविदास उपरे (नववधु) वय १८ वर्ष यांना उपचारासाठी नागपूरला हलवताना मृत्यू झाला. जखमी मध्ये राजनंदिनी सुनिल पवार वय ४ वर्ष, साधना कोंडबा गोंधरे वय ३५ वर्ष, पूजा शंकर उपरे वय २० वर्ष, चंपाबाई बाबा पेंडलेवार वय ७० वर्ष. जखमींना चंद्रपूर येथे पुढील उपचारा करिता रवाना करण्यात आले. घटनेचा तपास मारेगाव पोलीस करित आहे.

आपातकालीन ऍम्बुलन्स धुळ खात

रात्री 2 वाजताच्या दरम्यान मारेगाव पोलीस गाडीतून हायवेवर पेट्रोलिंग करीत होते. त्यांना अपघात झाल्याचे निदर्शनास येताच त्यांनी त्वरित 108 क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र शासनाची 24 तास सेवा देणारी ऍम्बुलंस उपलब्ध नसल्याने त्यांनी लगेच खासगी वाहन चालकांना संपर्क करत जखमींना उपचारासाठी मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. गेल्या एक महिन्यांपासून रुग्णालयात डॉक्टर नसल्याने आपातकालीन ऍम्बुलन्स बंद असल्याची माहिती आहे.

Comments
Loading...