दोन दुचाकीची समोरासमोर धडक, एक ठार तर दोन जखमी

यवतमाळ रोडवरील अहफाज जिनिंग समोर भीषण अपघात

भास्कर राऊत, मारेगाव: एकमेकासमोरून येणाऱ्या दोन दुचाकी वाहनांचा अपघात होऊन एक जण जागीच ठार तर दोन जखमी झाल्याची दुर्दैवी घटना दि ७ फेब्रुवारी रोजी शहरापासून एक किमी अंतरावर असलेल्या मारेगाव- यवतमाळ रोडवर असलेल्या अहफाज जिनिंग जवळ दुपारी साडेचार वाजता घडली.

प्रकाश महादेव शेडमाके वय ३५ रा. मागुर्ला ता झरी हा आपल्या मोटरसायकल क्रमांक MH 29 BU3249 ने वणीकडे जात होता. तर सय्यद इरफान सैय्यद अहमद वय ३४ व शेख फहिम शेख मतीन वय २४ वर्ष दोघेही राहणार थाटीपुरा अदीलाबाद हे वणी वरून AP 01R 4340 या मोटारसायकलने करंजी कडे जात होते.

अहफाज जिनिंग समोर या दोन मोटारसायकलमध्ये समोरासमोर जोरदार धडक झाली. यात प्रकाश शेडामे याचे डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर गंभीररीत्या जखमी झालेल्या दोन जखमी वर येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालय यवतमाळ येथे हलविण्यात आले आहे. अधिक तपास मारेगाव पोलीस करीत आहे.

अहफाज जिनिंग ठरतोय मृत्यूचा हॉटस्पॉट
मारेगाव ये करणवाडी दरम्यान पेट्रोल पंप , अहफाज जिनिंग ही ठिकाणे अपघातप्रवण स्थळ म्हणून प्रसिद्ध आहेत. आठवड्यात एकदा तरी या जागेवर काहीतरी घटना घडल्याशिवाय राहत नाही. एकंदरीत “मृत्यूचे ठिकाण “म्हणून ती जागा प्रसिद्ध झालेली आहे. याकडे ना बांधकाम विभागाचे लक्ष आहे ना कोण्या अधिकारी, पदाधिकारीयांचे लक्ष आहे. येथे अपघात थांबवण्यासाठी चौपदरी रस्त्याचे निर्माण करून एकेरी वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यात यावी अशीही मागणी यानिमित्ताने जोर धरत आहे.

Comments are closed.