★ चंद्रपूर येथे उपचार सुरू,
सुशील ओझा, झरी: मुकुटबन येथील सीतारा बारच्या 400 मीटर दूर अंतरावर एका दुचाकी चालकाने समोरासमोर धडक मारल्याने दोन्ही युवक गंभीर जखमी झाले असून त्यांचा उपचार चंद्रपूर येथील शासकीय रुग्णालयात सुरू आहे. 16 ऑगस्ट रोज सायंकाळी 4 वाजता दरम्यान ही घटना घडली.
अडेगाव वरून येणाऱ्या दुचाकीला आमलोन येथील अमोल भोयर नामक युवकाने समोरासमोर जबर धडक दिली. यात अडेगाव येथील भगवान मासिरकर वय 43 व बंडू गोहणे वय 23 हे दोघेही गंभीर जखमी झाले. मासिरकर व गोहणे हे अडेगाव वरून मुकुटबन येथे येत होते तर आमलोन येथील अमोल भोयर हा मुकुटबन कडून अडेगाव कडे जात होता.
अमोल भोयर याने मासिरकर याच्या गाडीला जोरदार धडक दिली. त्यात भगवान व बंडू दोघेही दुचाकीने खाली पडले व मासिरकर यांच्या हातापायाला तर गोहणे याच्या डोक्याला व पायाला जबर दुखापत झाली. बंडू याचा पायाचा हाड मोडल्याची माहिती आहे. अमोल हा मुकुटबन वरून दारू पिऊन जात होता व अपघात होताच त्याच्या जवळील देशी दारूच्या शिष्या रोडवर पडून फुटल्याची माहिती आहे. मात्र सुदैवाने फुटलेल्या शिशाचे काच पोटात शिरले नाही अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती.
अपघाताची माहिती मिळताच जमादार मोहन कुडमेथे घटनास्थळी पोहचले व दुचाकी ठाण्यात लावली. जखमी यांना गावातीलच तरुणांनी मुकुटबन येथील रुग्णालयात दाखल केले. हातपाय व डोक्याला जबर मार असल्याने वणी रेफर करण्यात आले . परंतु तेथूनही चंद्रपूर हलविण्यात आले. पोलिसांनी हिरो स्प्लेडर दुचाकी क्र MH 29 BA, 7688 ही पोलीस स्टेशनला लावण्यात आली आहे.