फॅशन व इंटेरिअर डिझायनिंगसाठी मोफत डेमो क्लासेस

कॅडेन्स अकॅडमी वणी द्वारा विद्यार्थ्यांना अनोखी संधी

0

जितेंद्र कोठारी, वणी: देशभरात नावाजलेली कॅडेन्स अकाडमी या फॅशन व इंटेरिअर डिझायनिंगची शाखा गेल्या वर्षीपासून वणीत सुरू झाली असून डिझायनिंग क्षेत्रात करीयर बनविण्यात इच्छुक विद्यार्थ्यांसाठी मोफत डेमो क्लासेसचे आयोजन कॅडेन्स अकॅडमीतर्फे करण्यात आले आहे. फैशन डिझायनिंगमध्ये उत्सुक विद्यार्थ्यासाठी दि. 18, 19, 20 व 21 ऑगस्ट रोजी डेमो क्लासचे आयोजन करण्यात आले आहे. तर इंटिरिअर डिझायनिंगमध्ये प्रवेश घेण्यास इच्छुक विद्यार्थ्यांना दि. 23, 24 व 25 ऑगस्ट रोजी डेमो क्लासमध्ये भाग घेता येईल. 7 दिवसाच्या या डेमो क्लाससाठी विद्यार्थ्यांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.


यावर्षीच्या सत्रासाठी विविध कोर्समध्ये प्रवेश सुरू झाला आहे. यासाठी वणीतील विद्यार्थ्यांना ऑफलाईन तसेच बाहेरगावातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.
कॅडेन्स अकॅडमीतर्फे 10 वी व 12 ऩंतर फॅशन आणि इंटेरिअर डिझायनिंगसाठी तीन कोर्स उपलब्ध करून दिले गेले आहे. यात 10 वी नंतर एक वर्षाचा डिप्लोमा कोर्स व दोन वर्षांचा ऍडव्हान्स डिप्लोमा तर 12 वी नंतर तीन वर्षांचा डिग्री कोर्स उपलब्ध आहे. वणीतील विद्यार्थ्यांना कॅडेन्स अकाडमी, दुसरा मजला, युनियन बँकेच्यावर आबड भवन समोर वणी येथे संपर्क साधून ऍडमिशन करता येईल तर बाहेरगावाच्या विद्यार्थ्यांना गुगल फॉर्म भरून (लिंक – https://forms.gle/Q6JHRWYSm8bd4Lo47 ) ऍडमिशन करता येईल.


कॅडेन्स अकाडमी ही फॅशन आणि इंटेरिअर डिझायनिंगमधली देशातील एक नामवंत शैक्षणिक संस्था असून त्याची नागपूर, पुणे, रायपूर, हैदराबाद, अमरावती अशा मोठ्या शहरात 20 पेक्षा अधिक शाखा आहे. या कोर्ससाठी मेट्रोसिटीतील तज्ज्ञ फॅकल्टी विद्यार्थ्यांना शिकवणार आहेत. तसेच वार्षिक फॅशन शो, प्रदर्शनी यासह पास होणा-या विद्यार्थ्यांच्या जॉबसाठी प्लेसमेन्ट व्यवस्थाही अकॅडमीतर्फे करून दिली जाणार आहे. कोर्ससाठी मोजक्या जागा असून प्रवेश मिळवण्यासाठी व अधिक माहितीसाठी लवकरात लवकर संपर्क साधावा असे आवाहन कॅडेन्स अकॅडमीतर्फे करण्यात आले आहे.

पत्ता: कॅडेन्स अकॅडमी, आबड भवन समोर, दुसरा मजला, युनियन बँकेच्या वर, टागोर चौक वणी
अधिक माहितीसाठी संपर्क: 8924842842    8924843843
ऑनलाईन ऍडमिशनसाठी लिंक: https://forms.gle/Q6JHRWYSm8bd4Lo47

Leave A Reply

Your email address will not be published.