विवेक तोटेवार, वणी: रांगणा-नांदेपेरा रोडवर ऑटो पलटी झाला. या अपघातात एक जण ठार झाला तर चार विद्यार्धी किरकोळ जखमी झाले आहेत. आज सकाळी 7.30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. ऑटो चालक शंकर पारटकर हा सेलू येथील रहिवासी आहे. तो सेलू ते वणी असा ऑटो चालवतो. आज बुधवारी दिनांक 4 ऑक्टोबर रोजी सकाळी 7 वाजताच्या सुमारास ऑटोचालक शंकर हा नेहमीप्रमाणे ऑटोने (MH29 V8137) सेलूहून काही प्रवाशांना सोबत घेऊन नांदेपेरा येथे गेला. तिथून त्याने काही कॉलेजच्या विद्यार्थ्यांना सोबत घेतले. ऑटोत घेऊन तो रांगणामार्गे वणीसाठी निघाला. त्यावेळी ऑटोत सुमारे 12 जण असल्याची प्राथमिक माहिती आहे. सकाळी 7.30 वाजताच्या सुमारास रांगण्याजवळ ऑटो चालकाचे ऑटोवरील नियंत्रण सुटले व ऑटो रस्त्याच्या बाहेर जाऊन पलटी झाला. यात गणपत धोंडू सातपुते (55) रा. सेलू हा गंभीर जखमी झाला. त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. जे विद्यार्थी किरकोळ जखमी होते. त्यांना प्राथमिक उपचारानंतर सुटी देण्यात आली. ऑटो अचानक लॉक झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटून हा अपघात झाल्याची माहिती ऑटोत असलेल्या विद्यार्थ्यांनी दिली.
निकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी
2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.
Comments are closed.