वणी-वरोरा बायपासजवळ सिमेन्ट भरलेला ट्रक पलटी

चालक जखमी, मध्यरात्रीची घटना

विवेक तोटेवार, वणी: चिखलगाव जवळील वणी-वरोरा बायपासजवळ रात्री एक ट्रक पलटी झाला. या अपघातात ट्रक चालक जखमी झाला. फिरोज खान (40) रा. बोरी अरब असे जखमी ट्रक चालकाचे नाव आहे. सदर ट्रक हा जैन ट्रान्सपोर्टचा असल्याची माहिती आहे. मंगळवारी दिनांक 3 ऑक्टोबरच्या रात्री उशिरा ट्रक चालक फिरोज हा मुकुटबन येथील सिमेन्ट कंपनीतून ट्रकमध्ये (MH34 BG4309) सिमेंट भरून खामगावला जात होता. रात्री 12 वाजताच्या सुमारास चिखलगाव जवळील वणी-वरोरा बायपास जवळ येथे ट्रक चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले व ट्रक पलटी झाला. यात चालकाच्या डोक्याला व हाताला मार लागला. चालकाला डुलकी आल्याने अपघात झाल्याचे बोलले जात आहे. अपघात झाल्याचे लक्षात येताच काही लोकांनी चालकाला ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. चालकाची प्रकृती धोक्याबाहेर असून चालकावर वणीतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

Comments are closed.