भरधाव ट्रकने चिरडले महिलेला, महिलेचा जागीच मृत्यू

वडगाव टी-पॉइंटजवळ दुपारी भीषण अपघात

विवेक तोटेवार, वणी: वडगाव टी-पॉइंटजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात भरधाव ट्रकचे चाक महिलेच्या अंगावरून गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. शुक्रवारी दिनांक 5 जानेवारी रोजी 11.15 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. छबुताई उत्तम भोंगळे (57) असे मृत महिलेचे नाव आहे. हा अपघात इतका भीषण होता की यात मृतकाचे डोके चेंदामेंदा झाले.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, उत्तम भोंगळे (अंदाजे 65) हे वणीतील रविनगर येथील रहिवासी आहे. आज वरोरा येथे त्यांच्या एका नातेवाईकांचे लग्न होते. लग्न समारंभासाठी ते सकाळी 11 वाजताच्या सुमारास शाईन या दुचाकीने (MH29 BW1749 ) त्यांच्या पत्नी छबुताई यांच्यासह वरो-यासाठी निघाले. दरम्यान वडगाव टी पॉईंट जवळ त्यांचे दुचाकी स्लीप झाली.

त्यामुळे उत्तम हे रस्त्याच्या कडेला पडते तर छबुताई या रस्त्यावर पडल्या. दरम्यान बायपासवरून एक भरधाव ट्रक (MH34 BG3647) वरो-याच्या दिशेने जात होता. मागून येणा-या या ट्रकचे चाक छबुताईंच्या डोक्यावरून गेले. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळतात घटनास्थळी लोक गोळा झाले होते. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच ते देखील घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घटनेचा पंचनामा केला व मृतदेह उत्तरिय तपासणीस ग्रामीण रुग्णालयात पाठवला. घटनेचा तपास वणी पोलीस करीत आहे. मृतकाच्या पश्चात दोन मुली, मुलगा असा आप्त परिवारआहे. 

नोकरी आणि पैशावर दावा करणा-या तोतया पत्नीवर गुन्हा दाखल

Comments are closed.