अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, एक जखमी

वणी वरोरा रोडवर झोला फाट्याजवळील घटना

0

जितेंद्र कोठारी, वणी: आपल्या मित्रासह दुचाकीने वरोरा येथून वणीकडे येत असताना अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकी चालक तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी वणी वरोरा मार्गावर झोला फाट्याजवळ घडली. अक्षय प्रेमदास जुमळे (वय 24 वर्ष) असे अपघातात मरण पावलेल्या तरुणाचे नाव आहे.

      

प्राप्त माहितीनुसार अक्षय जुमळे हा आपल्या मित्र अनिरुद्ध मेश्रामसह वरोरा येथे गेला होता. रात्री उशिरा वरोरा येथून वणीकडे परतताना झोला फाट्याजवळ एका अज्ञात वाहनाने अक्षयच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघातात अक्षयचा जागीच मृत्यू झाला तर त्याचा मित्र अनिरुद्ध हा गंभीर जखमी झाला. अपघातानंतर ते त्याच अवस्थेत पडून होते.

बुधवारी पहाटेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. जखमी अनिरुद्ध याला उपचाराकरिता चंद्रपूर येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले. घटनेबाबत वणी पोलिसांनी मर्ग दाखल केले आहे. पुढील तपास जमादार जगदीश बोरनारे करीत आहे.

मंगलम पार्क येथे सुरू असलेल्या मटका अड्डयावर पोलिसांची धाड

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments
Loading...