श्रीराममंदिर निर्माण निधी समर्पण व गृह संपर्क अभियान

टागोर चौकात संपर्क कार्यालयाचे उदघाटन

0

जब्बार चीनी, वणी: अयोध्या येथील श्रीराममंदिर निर्माणाकरिता संपूर्ण देशामध्ये दि 15 जानेवारी ते 27 फेब्रुवारी पर्यंत निधी समर्पण व गृहसंपर्क अभियान राबविण्यात येणार आहे. याकरिता वणी येथे स्थानिक टागोर चौक येथे श्री कामाक्षी देवी मंदिर समोर संपर्क कार्यालयाचे उद्घाटन दि 10 जानेवारीला अभियानाचे तालुका प्रमुख वसंतराव धानोरकर यांच्या हस्ते झाले.

या प्रसंगी राष्ट्रीय स्वसंयंसेवक संघाचे तालुका संघचालक हरिहर भागवत, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, अनिल आक्केवार प्रामुख्याने उपस्थित होते.

संपूर्ण देशात सुरू होणाऱ्या या अभियानात समाजातील सर्व घटकांचा समावेश राहील अशी योजना करण्यात आली आहे. याकरिता वणी तालुक्याचे अभियान समितीप्रमुख म्हणून वसंतराव धानोरकर व वणी नगरप्रमुख म्हणून अनिल आक्केवार राहणार आहेत.

दीड महिना चालणाऱ्या या अभियानाचे कामकाज सुरळीत होण्यासाठी संपर्क कार्यालय करण्यात आले आहे. वणी तालुक्यातील प्रत्येक कुटुंबाने भगवान श्रीरामाचे मंदिर भव्य होण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आवाहन अतिथीनी केले. या प्रसंगी नगरातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

हेदेखील वाचा

कुंभ्याचे लोकप्रतिनिधी म्हणजे नवरदेव: अरविंद ठाकरे

 

हेदेखील वाचा

साई लॅपटॉप व कॉम्प्युटर गॅलरीमध्ये मकरसंक्रांती ऑफर

 

Leave A Reply

Your email address will not be published.