कायर रोडवर एकाच दिवशी दोन अपघात, दोघांचा मृ्त्यू

एक जागीच ठार तर दुस-याचा उपचारासाठी नेताना वाटेत मृत्यू

जितेंद्र कोठारी, वणी: शनिवारी कायर मार्ग हा यमराजाचे द्वार ठरला. शनिवारी या मार्गावर अवघ्या 3 तासांच्या दरम्यान दोन अपघात झाले. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. यातील एक जण जागीच ठार झाला तर दुस-या जखमीचा उपचारासाठी हलवताना मृत्यू झाला. संतोष विठ्ठल सिडाम (वय 35) रा. पिंपरी कायर ह अक्षय देवतळे (25) रा. मानकी असे मृताचे नाव असून

पहिली घटना ही दुपारी घडली. संतोष विठ्ठल सिडाम (35) हा पिंपरी (कायर) येथील रहिवाशी होता. तो ट्रॅक्टरचालक म्हणून काम करायचा. शनिवारी तो कामानिमित्त दुचाकीने (MH29 N8402) वणी येथे आला होता. दुपारी तो काम आटपून गावी परतत होता. दरम्यान पेटून व वरझडी दरम्यान मार्गावर त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले व त्याने दुस-या एका दुचाकीस धडक दिली. दुचाकीवरून खाली पडल्याने संतोषच्या डोक्याला जबर मार लागला. त्याला उपचारासाठी वणीतील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले.

दुसरा अपघात हा संध्याकाळी 6 वाजताच्या दरम्यान मानकी जवळ झाला. अक्षय देवतळे (24) हा मानकी येथील रहिवाशी होता. तो शेतीचे काम करायचा. शनिवारी तो कामानिमित्त दुचाकीने वणी येथे गेला होता. संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास तो गावी परतत होता. दरम्यान मानकी जवळ त्याच्या दुचाकीला एका ट्रकने धडक दिली. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील लोकांनी त्याला उचलले व उपचारासाठी वणीतील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने अक्षयला प्राथमिक उपचारानंतर वणी येथून चंद्रपूर येथे हलवण्यात आले. मात्र वाटेतच त्याचा मृत्यू झाला. एकाच दिवशी एकाच मार्गावर दोघांचा अपघातात जीव गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

 

Comments are closed.