नांदेपेरा रोडवर दुचाकीची समोरासमोर धडक

चौघं जखमी, दोघांची परिस्थिती गंभीर

0 2,069

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील वणी नांदेपेरा रोडवर संध्याकाळी 6 वाजताच्या दरम्यान भरधाव वेगाने जाणा-या दोन दुचाकींची समोरासमोर जबर धडक झाली. यात दोघं गंभीर जखमी असून मागे बसलेल्या दोघांना किरकोर दुखापत झाली आहे.

शनिवारी सायंकाळी 6 वाजता वणी नांदेपेरा मार्गावर गाडीचालक रशीद (संपूर्ण नाव अद्याप कळू शकले नाही. केवळ हातावर रशीद इतकंच गोंदवून असल्यावरून ही ओळख देण्यात आली आहे.) हा हरीश कुडमेथे या व्यक्तीसोबत दुचाकीने नांदेपे-याकडे जात होते. राजू तोडासे हा मिस्त्रीकाम करतो. राजू याचे काम संपल्यानंतर तो  गणेश तोडासे सोबत नांदेपे-याहून वणीला येत होता. नांदेपेरा रोडवर  त्यांच्या दुचाकीची समोरासमोर जबर धडक झाली. यात राजू कोरडे यांच्या डोक्याला मार लागला आहे. तर रशीद गंभीर जखमी झाला.

मागे बसलेले हरीश कुडमेथे आणि गणेश तोडासे यांना किरकोर मार लागला. दोन्ही गंभीर जखमींना उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. राजू याच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर परिस्थिती हलाखीची असल्याने यास चंद्रपूर येथील रुग्णालायत हलविण्यात आले आहे. तर रशीद याच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे.

दुचाकीस्वाराजवळील पिशवीत दारूच्या बॉटला?

रशीद यांच्या मागे बसलेला हरीश कुडमेथे याने दावा केला आहे की आपण रशीद याला ओळखत नसून आपण फक्त लिफ्ट मागितली होती. मात्र रशीद याचा क्रमांक हरीश याच्या मोबाईलमध्ये सेव असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. तर घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांच्या मते दुचाकीस्वाराजवळील पिशवीत दारूच्या बॉटल आढळल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे हे नेमकं काय गौडबंगाल आहे याची उकल अद्याप झालेली नाही.

Comments
Loading...