भालर रोडवर अपघात, तरुणाचा जागीच मृत्यू तर एक गंभीर

वेकोलि कर्मचा-याचा मृत्यू, वणीहून भालरला परत जाताना अपघात

बहुगुणी डेस्क, वणी: दुचाकी चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुचाकी कम्पाउंडला धडकली. या अपघातात मागे बसलेला जागीच ठार झाला तर चालक गंभीर जखमी झाला. रविवारी रात्री 8.30 वाजताच्या सुमारास वणी भालर मार्गावर हा अपघात झाला. प्रशांत कुमार (27) रा. भालर वसाहत असे मृत तरुणाचे नाव आहे. तर रोनित मिश्रा असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

Podar School 2025

प्राप्त माहिती नुसार, मृत प्रशात कुमार हा परप्रांतीय असून तो दोन वर्षापूर्वी वेकोलि येथे नोकरीला लागला होता. तो मायनिंग सरदार या पदावर होता. तो भालर वसाहत येथे राहत होता. त्याचा मित्रा रोनित याने काही दिवसांआधीच अपाचे ही नवीन बाईक विकत घेतली होती. रविवारी दिनांक 3 नोव्हेंबर रोनित हा प्रशांतसोबत वणी येथे कामानिमित्त आला होता. काम आटोपल्यानंतर ते रात्री भालर येथे घरी परत जात होता.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

दरम्यान 8.30 वाजताच्या सुमारास भालर रोडवरील हनुमान मंदिराजवळील वळणावर रोनितचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले व दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या एका टाउनशीपच्या कम्पाउंडला धडकली. यावेळी दुचाकी इतकी भरधाव होती की धडक झाल्यानंतर मागे बसलेल्या प्रशांतचे डोके भिंतीवर आदळल्यावर रक्तस्राव होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याचा चालक मित्र रोनित हा गंभीर जखमी झाला.

अपघाताची माहिती रस्त्यावरून ये-जा करणा-या लोकांना कळली. त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घटनेचा पंचनामा केला. जखमी रोनितला उपचारासाठी रेफर करण्यात आले. प्रशांतचा मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. घटनेमुळे वेकोलि कर्मचा-यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

संजय खाडेंची लढण्याची घोषणा… पत्रकार परिषदेत खाडे यांना अश्रू अनावर

अपक्षांना मिळाले बोधचिन्ह, कोणत्या उमेदवारांचे कोणते बोधचिन्ह?

Comments are closed.