वनविभागाच्या अधिका-यांची आरोपीस मारहाण, दोघांविरोधात तक्रार
तपासणीसाठी आणल्यानंतर बेदम मारहण केल्याचा आरोप
ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव वनपरिक्षेत्रात येत असलेल्या बोटोणी (पालगाव) येथील ५५ वर्षीय इसमास मारेगाव वनपरिक्षेत्र अधिकारी व वनरक्षक यांनी मागील बुधवारी बेदम मारहाण केल्याची तक्रार दि. ५ मे रोजी मंगळवारला मारेगाव पोलीसात झाली आहे.
प्राप्त माहिती नुसार फिर्यादी भिमराव भवाणी कुसराम वय ५५ रा. बोटोनी (पालगांव) ता. झरी यांचेवर जंगलातील सागवान चोरी प्रकरणी आरोप आहे. त्या प्रकरणी त्यांना मारेगाव येथे आणून त्यांची ग्रामीण रूग्नालयात वैद्यकिय तपासणी करण्यात आली. तेथून परत मारेगाव येथील वन विभाग रेंजर कार्यालयात आणले तिथे वनपरिक्षेत्र अधिकारी विक्रांत खाडे, वनरक्षक तुमराम व देवुरकर या तिघांनी बेदम मारहान केली या आशयाची तक्रार मारेगांव पोलीसात दिली आहे, वृत्त लिहे पर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.
फिर्यादी आपल्या शेतसर्वे नंबर ३६ बोटोनी (पालगांव) शिवारात स्वतःच्या शेतात सागवान लाकडाचे शेतीपयोगी अवजारे बनविण्याचे कामे करतो, वन विभागाने घरातील लाकडे जप्त करून रेंजर कार्यालय मारेगाव येथे नेऊन तिघानी बेदम मारहान केल्याची तक्रार दाखल केली, तक्रारीची चौकशी करून न्याय देण्यात यावा असी मागणी फिर्यादी भिमराव कुसराम यांनी केली आहे.
तक्रार दाखल करणे एक षडयंत्र – खाडे
मागील हप्त्यातील जंगलातील सागवान चोरी प्रकरणी त्याच्या घरातील मिळाकेल्या सागवान प्रकरणी भिमराव कुसIराम आरोपी आहे. कायद्यानुसार कारवाई वन विभागा मार्फत सुरु आहे, त्याला बुधवारी मारहान झाली तर सात दिवस तक्रार देण्यासाठी का थांबला? वनाचे रक्षण करणे आमचे काम आहे. आम्ही कुठलीही मारहान केली नाही. उशिरा तक्रार दाखल करणे हे षडयंत्राचा भाग आहे.
– विकांत खाडे, वनपरिक्षेत्र अधिकारी, मारेगाव