अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी आरोपीला शिक्षा

रंगनाथ नगर येथील घटना, आरोपीस 4 वर्ष कारावास व 3 हजार रुपये दंड

विवेक तोटेवार, वणी: 10 सप्टेंबर 2015 रोजी एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी वणी पोलिसात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी न्यायालयात गुन्हा सिद्ध झाल्याने अतिरिक्त सत्र न्यायालय पांढरकवडा यांनी 9 सप्टेंबर 2021 रोजी आरोपीला 4 वर्ष कारावास व 3 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास 3 महिन्याचा सश्रम कारावासाची शिक्षा ही सुनावली आहे.

सविस्तर वृत्त असे की, 10 सप्टेंबर 2015 रोजी आरोपी आकाश संतोष गुंडेवार (26) रा. रंगनाथ नगर वणी याने आपल्या घराजवळ राहणाऱ्या पीडितेच्या घरी कुणी नसल्याचे पाहून प्रवेश केला. तिचा विनयभंग केला. तिथे कुणी तरी आल्याची चाहूल लागताच त्याने तिथून पळ काढला. याबाबत पीडितेच्या कुटुंबीयांनी वणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती.

तक्रारीवरून आरोपीवर भादंविच्या कलम 354 (अ), (ब), 452 तसेच बाललैगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोस्को) कलम 8, सहकलम 3 (1) (11) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. वणी पोलिसांनी तपास करून प्रकरण न्यायप्रविष्ट केले होते. याप्रकरणी 9 सप्टेंबर 2021 रोजी निर्णय देण्यात आला.

निर्णयामध्ये आरोपी आकाशला कलम 453 अंतर्गत 4 वर्षे कारावास व 3 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास 3 वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. सदर निकाल अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश पी. बी. नाईकवाड यांनी सुनावली.

या प्रकारणामध्ये 10 साक्षीदार तपासण्यात आले. सरकारी वकील म्हणून ऍड प्रशांत ए मानकर यांनी बाजू बघितली. तर तपास अधिकारी म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक पवार तर पैरवी अधिकारी म्हणून हवालदार अनिल दानव यांनी काम बघितले

हे  देखील वाचा:

गणेशोत्सव ऑफर: सोलर झटका मशिनवर तुर कटर, डॉग हॉर्न, टॉर्च मोफत

लग्न होत नसल्यामुळे चिडवल्याने दोन मित्रांमध्ये वाद

पकड वारंट निघालेल्या विविध गुन्ह्यातील 17 आरोपींना अटक

 

Comments are closed.