मोमिनपुरा गँगवार प्रकरणातील आरोपीला कोरोनाची लागण

यवतमाळ येथे रुग्णालयात उपचार घेताना कोरोना निष्पन्न

0

जब्बार चीनी, वणी: 27 मेच्या मध्यरात्री मोमिनपु-यामध्ये दोन गटात तुफान हाणामारी झाली होती. या प्रकरणी पोलिसांनी 29 आरोपींना अटक केली होती. आरोपींची रवानगी यवतमाळ येथील कारागृहात करण्यात आली होती. नुकतच त्यातील आरोपींना न्यायालयाने जामीन मंजूर केला होता पण त्यातील एका आरोपीला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे आता वणीत कोरोना रुग्णांची संख्या 40 झाली आहे. आज जिल्हाधिका-यांनी जाहीर केलेल्या यादीत अचानक मोमिनपु-याचे नाव आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

दिनांक 27 मे च्या रात्री मोमिनपुरा येथे दोन गटात पूर्ववैमन्यस्यातून गँगवार झाला. त्यात काही जखमी देखील झाले होते. या प्रकरणी पोलिसांनी आधी 14 व नंतर 15 अशा एकूण 29 आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. यवतमाळ येथे असताना त्यातील एक आजारी होता. दरम्यान अलिकडेच या प्रकरणातील आरोपींना न्यायालयाने जामीन मंजूर केला. जामीन मंजूर होताच आरोपी क़ॉरन्टाईन झाले होते. तर त्यातील एकामध्ये कारागृहातच कोरोनाचे लक्षणं दिसत असल्याने त्याला कारागृहातून रुग्णालयात दाखल कऱण्यात आले होते. आज त्याचा रिपोर्ट आला व त्यात तो पॉजिटिव्ह असल्याचे आढळून आले.

अन् मोमिनपु-यात वाढले काही काळासाठी टेन्शन….
आज संध्याकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाने जाहीर केलेल्या कोरोना बुलेटीनमध्ये अचानक वणीतील मोमिनपुरा येथील एक रुग्ण असल्याचे जाहीर करण्यात आले. पण मोमिनपु-या रुग्ण आढळल्यावर जी प्रशासकीय हालचाल दिसते तशी काहीच हालचाल नसल्याने परिसरातील नागरिक गोंधळून गेले. मात्र काही वेळाने ती व्यक्ती मोमिनपु-यातील असली तरी ती व्यक्ती यवतमाळ येथे पॉजिटिव्ह निघाल्याचे कळल्यावर परिसरातील नागरिकांचा जीव भांड्यात पडला.

दरम्यान आज वणीतून पाठविण्यात आलेल्या 39 स्वॅबचे रिपोर्ट प्राप्त झाले. तर 38 व्यक्तींच्या रॅपिड ऍऩ्टिजन टेस्ट करण्यात आली. हे सर्व रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. अद्याप 316 रिपोर्ट येणे बाकी आहेत. सध्या वणीत कोरोनाचे एकूण रुग्ण 40 असून त्यातील 32 जणांनी कोरोनावर मात केली आहे. एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे, तर 7 व्यक्ती ऍक्टिव्ह आहेत. यातील 4 रुग्णांवर यवतमाळ येथे तर 3 रुग्णांवर वणी येथे उपचार सुरू आहे. सध्या वणीत एक कन्टेन्मेन्ट झोन असून तीन कन्टेन्मेन्ट झोन ग्रामीण भागात आहेत.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.