लोखंडी पोल चोरणारे आरोपी जेरबंद, अवघ्या काही तासांत अटक

भास्कर राऊत, मारेगाव: भालेवाडी रोपवन क्षेत्रातील रोपांना कुंपण घालण्यासाठी आणलेल्या पोलमधून 50 लोखंडी पोल चोरीला गेल्याचे गुरुवारी रात्री उघडकीस आले होते. या प्रकरणी मारेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवीत आज शुक्रवारी दि. 20 जुलैला दोन आरोपींना अटक केली असून आणखी काही मोहरे पोलिसांच्या रडारवर आहे.

मारेगाव तालुक्यातील भालेवाडी रोपवन वाटीकेच्या लोखंडी पोल आणि तारेच्या संरक्षणाचे काम पांढरकवडा येथील ठेकेदार रोहित लक्ष्मण बोलेनवार यांना टेंडरद्वारे मिळाले होते. त्यासाठी त्यांनी 10 जुलैला 900 लोंखडी ms अँगलचे पोल आणले. आणि मजु्रांकरवी गाडले. सदर गडलेल्या पोलची पाहणी करनेकरिता ठेकेदार आणि त्यांचे मजूर हे दि. 19 जुलैला रात्रीचे सुमारास गेले असता त्यांना त्यातील गाडून ठेवलेले 50 लोखंडी पोल (किंमत अंदाजे 30 हजार रुपये) आढळून आले नाही.

सदर चोरी गेलेले पोल सगळीकडे शोधले असता मिळून न आल्याने अखेर ठेकेदाराने मारेगाव पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. सदर गुन्हयातील फरार आरोपी व मुददेमाल शोधकरीता तात्काळ पो.स्टे. चे पथक तयार करुन नमुद गुन्हयातील आरोपी 1) हुसेन सदानंद आडे वय 24 वर्ष रा. बोदाड ता. मारेगाव 2) शाम महादेव गाताडे वय 29 वर्ष रा. सालेभटटी ता. मारेगांव यांना पाथरी शिवारातुन मुददेमालासह ताब्यात घेतले.

सदर आरोपीनी गुन्हा कबुल केला असून त्यांचेकडून एम. एस.अँगल पोल 50 अंदाजे 30,000 रु. हस्तगत करण्यात आला आहे. सदर गुन्हयात पुन्हा कोणाचा सहभाग आहे याबाबत पुढील तपास पोलीस करीत आहे. त्या अनुषंगाने तपास सुरु आहे. सदर आरोपीवर कलम 379, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

सदर गुन्हयाचा तपास पवन बन्सोड पोलीस अधिक्षक यवतमाळ, पियुष जगताप अपर पोलीस अधिक्षक यवतमाळ, गणेश किंद्रे, उपविभागीय पोलीस अधिकारी वणी, पो.नि. आधारसिंग सोनवणे स्थागुशा यवतमाळ यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि. जर्नाधन खंडेराव ठाणेदार मारेगाव, पोहेकॉ. आनंद अलचेवार, नापोकॉ. आर वाभीटकर नापोकॉ. रजनीकांत पाटील चासफो प्रमोद जिडडेवार, पोकॉ. विकास खंडारे व चापोकॉ. अतुल सरोदे यांनी केले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.