पुष्पाताई आत्राम यांना राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार

व्यंकटेश आत्राम यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित साहित्य सोहळ्यात प्रदान

बहुगुणी डेस्क, वणी: आदिवासी साहित्यिक गोंडी संस्कृतीचे संशोधक जंगो राईताड वृत्तपत्राचे संपादक व्यंकटेश आत्राम यांचा आर्वी येथे स्मृतिदिन झाला. त्यानिमित्त साहित्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष प्रा. डॉ. नंदा तायवाडे यांच्या हस्ते वणीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पुष्पाताई आत्राम यांना राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यावेळी व्यंकटेश आश्रम लिखित ‘डंगुडा मांजो’ या गोंडी भाषेतील काव्यसंग्रहाचे तसेच प्रब्रम्हानंद मडावी लिखित ‘जयपाल सिंह जीवन चरित्र’ या पुस्तकांचं प्रकाशनही झालं.

यावेळी विचारपिठावर यशोदा आत्राम, प्रा. डॉ. विनायक तुमराम, दशरथ मडावी, प्रभू राजगडकर उषाकिरण आत्राम, प्रभाकर गंभीर, प्रब्रम्हानंद मडावी, संतोष पावरा, डॉ. गजानन सोयाम, प्रशांत ढोले, सुरेश भिलवाडे, प्रा. प्रवीण कांबळे, राहुल कनाके, पवन जंगम, पी. डी. आत्राम, नंदकुमार बोधकर, अशोक नागभीडकर, शरद बेसकर आदी मान्यवर उपस्थित होते.

पुष्पाताई आत्राम गेल्या अनेक दशकांपासून आदिवासींसाठी कार्य करीत आहेत. त्यांना महाराष्ट्र शासनाचा आदिवासी सेवक पुरस्कारदेखील मिळालेला आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.