पत्रकारावर हल्ल्याचा विविध पत्रकार संघटनेकडून जाहीर निषेध

पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत कारवाईची मागणी

विवेक तोटेवार, वणी : विरोधात बातमी लावल्याच्या राग धरून येथील पत्रकार रवी ढुमणेवर काही दिवसांपूर्वी नांदेपेरा चौफुलीवर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख व त्याच्या काही सहकाऱ्यानी लाठीकाठी व हॉकी स्टिकने रवी ढुमणेला बेदम मारहाण केली. या घटनेचा वणीतील विविध पत्रकार संघटनेनी निषेध नोंदविला आहे. पत्रकार संघटनातर्फे उपविभागीय अधिकारी वणी व उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन देऊन आरोपी विरुद्द पत्रकार संरक्षण कायदा 2019 च्या भाग चार नुसार कारवाईची मागणी केली आहे.

वणी उपविभागात राजकीय नेत्यांचे पाठबळ असलेले काही  रेती व गौण खनिज माफियांकडून लाखों रुपयांचा महसूल बुडवन दिवसाढवळ्या खनिज चोरी सुरु आहे. दैनिक नमो महाराष्ट्र वृत्तपत्राचे स्थानिक प्रतीनिधी रवी ढुमणे यांनी याबाबत आपल्या वृत्तपत्र व पोर्टलवर बातम्या प्रकाशित केल्या होत्या. विरोधात बातमी का लावली म्हणून शिवसेनेचे माजी तालुका प्रमुखानी 11 एप्रिल 2022 रोजी दुपारी 4.30 वाजता पत्रकार रवी ढुमणेवर जीवघेणा हल्ला केला होता. याबाबत पत्रकार रवी ढुमणे यांच्या तक्रारीवरून वणी पोलीस ठाण्यात आरोपी गणपत लेडांगे, महेश चौधरी व इतर 2 विरुद्द कलम 324, 504, 506, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.    

अन्याय व भ्रष्टाचाराविरुद्द आवाज उठविणाऱ्या पत्रकारांवर जीवघेण्या हल्ल्याच्या विरोधात पत्रकार जब्बार चिनी, राजू धावंजेवार, मो मुस्ताक, राजू तुरणकार, रमेश तांबे, सागर मुने, विवेक तोटेवार, प्रशांत चंदनखेडे, अजय कंडेवार, रामकृष्ण वैद्य, श्रीकांत किटकुले, राजू गव्हाणे, सूरज चाटे,पुरुषोत्तम नवघरे, सुरेंद्र इखारे, रवी ढुमणे यांनी उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन देत कडक कारवाईची मागणी केली आहे.

काय आहे पत्रकार संरक्षण कायदा ?

महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा 2019 मध्ये अस्तित्वास आला. या काद्यानुसार पत्रकारांवर हल्ला करणारांना 3 वर्षाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. पत्रकारांवरील हल्ला हा आता आजामीनपात्र गुन्हा ठरलेला असून पत्रकारांवरील हल्ल्याची चौकशी डिवायएसपी दर्जाचा अधिकारी करणार आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.