सुगंधित तंबाखू विक्रेत्यावर कारवाई: 28 हजारांचा तंबाखू जप्त

विवेक तोटेवार, वणी: दीपक चौपाटी जवळ एका सुगंधित तंबाखू विक्रेत्यांवर पोलिसांनी कारवाई करत 28 हजारांचा सुगंधीत तंबाखू जप्त केला. मात्र आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले नाही. 18 मे रोजी ही कारवाई करण्यात आली.

दीपक चौपाटी येथे राधे राधे किराणा येथून महाराष्ट्रात बंदी असलेला सुगंधित तंबाखूची विक्री सुरू असल्याची माहिती वणी पोलिसांना मिळाली. माहितीवरून ठाणेदार प्रदीप शिरस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि आशिष झिमठे यांनी सदर ठिकाणी सापळा रचला. तब्बल दोन तासानंतर दुकान मालक राजेश मार्गमवार हा तंबाखू विकताना दिसून आला. याच वेळी पोलिसांनी त्याच्या दुकानाची झडती घेतली.

या ठिकाणी मजा कंपनीचे 30 डब्बे सुगंधित तंबाखू आढळून आला. मात्र आरोपीला पोलीस अटक करू शकले नाही. पोलिसांनी सदर तंबाखू जप्त केला व अन्न सुरक्षा अधिकारी घनश्याम दरडे यांच्या फिर्यादीवरून कलम 188, 269, 270, 272, 328, 273, भादवी सहकलम 26(2), 27, 30 (2) (अ), 59 अन्न सुरक्षा मानके अधिनियम नुसार गुन्हा दाखल केला.

सदर कारवाई ठाणेदार प्रदीप शिरस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली पोऊनी आशिष झिमठे, सागर सीडाम, शुभम सोनूले यांनी केली.

Comments are closed.