आजची कारवाई: 5 भाजी विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
भाजीच्या दुकानात सोशल डिस्टन्सिंगचे नियम धाब्यावर
विवेक तोटेवार,वणी: वणीतील नगर परिषदेच्या जवळ बसून भाजी विक्री करणा-य पाच भाजी विक्रेत्यांवर सोशल डिस्टन्सिंग न पाळल्यामुळे मंगळवारी दुपारी 1 वाजताच्या सुमारास कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्यावर भादंवि कलम 188 व 269 नुसार कारवाई करण्यात आली आहे.
संपूर्ण भारतात लॉकडाऊन असताना काही विक्रेते सोशल डिस्टन्सिंगचे नियम धाब्यावर बसवताना दिसत आहे. अशा विक्रेत्यांवरनगर परिषदेने कारवाईचा बडगा उगारला आहे. आज नगरपालिकेद्वारा 5 भाजी विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे. पुरुषोत्तम बंडू मांडाळे, संतोष गुलाब तराळे, संजय प्रभाकर सुतसोनकर, उमेश विठ्ठल नक्षीने, ऋषभ मुर्लीधर सेलवंटे अशी या भाजी विक्रेत्यांची नावं आहेत.
दुपारी नगर पालिकेचे मुख्याधिकारी पाहणी करण्यासाठी गेले असता त्यांना या भाजीच्या दुकानात पाच पेक्षा अधिक लोकांची गर्दी आढळून आली होती. यावेळी नगर मुख्याधिकारी व परिषदेच्या कर्मचारी यांनी या भाजी विक्रेत्यांवर कारवाई करीत त्यांची तक्रार वणी पोलिसात केली आहे. पोलिसांनी कलम 188 व 269 नुसार या पाचही जनावर गुन्हा नोंद केला आहे.