5 पानटपरी धारकांवर गुन्हा दाखल

आदेशाचे उल्लंघन केल्याने कार्यवाही

0

सुनील पाटील, वणी: जिल्हाधिकारी यांनी शहरातील सर्व दुकाने, पानटप-या रात्री 8 वाजता पर्यंत बंद ठेवण्याचा आदेश दिल्यानंतरही आदेशाचे उल्लंघन करणा-या पाच पान टपरी धारकांवर दि. 18 मार्च ला रात्री फौजदारी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

शहरातील पानटपरी बंद करण्यात याव्या याकरीता लाऊड स्पिकर वरून जाहीर आवाहन करण्यात आले होते. या आवाहानाला शहरात ब-यापैकी प्रतिसाद मिळत असताना काही पानटपरी धारकांनी या आदेशाचे उल्लंघन केले. यात शत्रुघ्न मालेकर जैन लेआऊट, श्रावण रणदिवे जैन लेआऊट, विजय दुर्गे पंचशील नगर, संगम जैन वरोरा रोड, अमर आडे पंचशील नगर या पाच व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक गोपाळ जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कलम 188 नुसार वणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून कार्यवाही केली आहे.

कार्यवाहीमुळे पानटपरीधारकांचे धाबे दणाणले
सध्या कोरोना संसर्गजन्य विषाणूने राज्यात चांगलेच थैमान घातले आहे. शहरात प्रादुर्भाव होवू नये याकरीता महसूल, आरोग्य, नगर परिषद व पोलीस प्रशासन युध्दस्तरांवर कार्यरत झाले आहे. मात्र वणीमध्ये शासनाच्या आदेशाला हरताळ फासून अवैधरित्या खर्राची विक्री सुरू आहे. मात्र आता प्रशासनाने कारवाईचा बडगा उचलल्याने पानटपरी धारकांचे धाबे दणाणले असून त्यामुळे खर्रा शौकिनांची चांगलीच पंचायत होताना दिसत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.