खासदार ओवैसी यांचे घरावर हल्ला करणाऱ्यांवर कारवाई करा

वणीतील एमआयएम कार्यकर्त्यांचे राष्ट्रपती यांना निवेदन

जितेंद्र कोठारी, वणी: ऑल इंडिया मजलिस -ए- इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) चे अध्यक्ष आणि हैद्राबाद येथील खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या दिल्ली येथील घरावर भ्याड हल्ला करणाऱ्या समाजकंटकांना अटक करून कठोर कारवाई करा, अशी मागणी एआयएमआयएम वणी शहर तर्फे महामहिम राष्ट्रपती यांच्याकडे करण्यात आली आहे. एआयएमआयएम वणी शहर अध्यक्ष आसिम हुसेन, शहर युवा अध्यक्ष शादाब अहमद व एआयएमआयएम कार्यकर्त्यांनी याबाबत आज उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे यांना निवेदन सोपवले.

खासदार असदुद्दीन ओवैसी यांचे 24- अशोक रोड नवी दिल्ली येथे शासकीय बंगला आहे. मंगळवार 21 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7 ते 8 समाजकंटकांनी ओवैसीच्या बंगल्यावर हल्ला करून तोडफोड केली होती. हल्लेखोरानी खासदार ओवैसीच्या नावाची नेमप्लेट, गेटवरील लॅम्प आणि खिडकिचा काच फोडला. हल्ल्याच्या वेळी खासदार ओवैसी बंगल्यावर हजर नव्हते.

विशेष म्हणजे खासदार ओवैसी यांचा बंगला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे घरापासून अवघ्या काही अंतरावर आणि अति सुरक्षित झोनमध्ये आहे. अति विशिष्ट व्यक्ती तसेच विशेष सुरक्षा क्षेत्रात राहणाऱ्या व्यक्तीवर जर असे खुलेआम हल्ला होत असेल, तर देशातील सर्वसामान्य व्यक्तीच्या सुरक्षिततेचा प्रश्न उत्पन्न होतो. असा निवेदनात नमूद करण्यात आला आहे.

एआयएमआयएम वणी शहर तर्फे खासदार ओवैसीच्या घरावर झालेल्या हल्ल्याचे निषेध करून त्यांना झेड प्लस सुरक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदन देते वेळी एआयएमआयएम वणी शहर अध्यक्ष आसिम हुसेन, शहर युवा अध्यक्ष शादाब अहमद व एआयएमआयएम कार्यकर्ते उपस्थित होते.

हे देखील वाचा:

ऍक्सिडेंटल नगराध्यक्ष… संजय देरकर…

Comments are closed.