बँकेसमोरून दुचाकी चोरणा-याच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

शहरातील 3 बँकेसमोरून चोरल्या होत्या दुचाकी

जितेंद्र कोठारी, वणी: शहरातील विविध बँकेसमोरून दुचाकी चोरणा-याला वणी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. महेंद्र सुधाकर मेश्राम रा. टेकरी, तालुका सिंदेवाही जिल्हा चंद्रपूर असे आरोपीचे नाव असून त्याला वरोरा येथून अटक करण्यात आली आहे. सोमवारी दिनांक 27 सप्टेंबर रोजी डीबी पथकाने ही कारवाई केली. आरोपीकडून चोरी केलेल्या तिन्ही मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या होत्या.

पहिल्या घटनेत रंगनाथ स्वामी पत संस्थांमध्ये अभिकर्ता पांडुरंग आनंदराव दानव (55) रा. गुलमोहर पार्क वणी यांनी दि. 9 ऑगस्ट 2021 रोजी इंडियन बँक समोर बलकी यांच्या चहा कँटीन जवळ ठेवलेली त्यांची हिरोहोंडा स्पेलँडर प्रो (MH29AQ6298) किंमत 25 हजार ही दुचाकी चोरीला गेली होती.

दुसऱ्या घटनेत सुधाकर दत्तू कुटारकर (50) रा. मेंढोली, ता. वणी यांची दि. 9 सप्टेंबर 2021 रोजी स्टेट बँकच्या मुख्य शाखा समोर समोर उभी केलेली हिरोहोंडा एचएफ डीलक्स (MH29BG5032) किंमत अंदाजे 30 हजार चोरी झाली होती. तर तिसरी घटना ही 3 ऑगस्ट रोजीची आहे. देविदास नामदेव शेटे रा. वणी यांची स्टेट बँके समोरून दुचाकी चोरीला गेली होती.

या तिन्ही घटनेबाबत वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी सपोनि आनंदराव पिंगळे हे तपास करीत होते. त्यांना सदर चोरी केलेल्या दुचाकी चोरीचे धागेदोरे हे चंद्रपूर जिल्ह्यात असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यावरून त्यांनी वरोरा पोलीस स्टेशन गाठले. तिथून त्यांनी आरोपी महेंद्र सुधाकर मेश्राम याला अटक केली. आरोपीने तिन्ही दुचाकी चोरल्याची कबुली दिली.

सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ, अपर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे, उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पुज्जलवार व पोलीस निरीक्षक श्याम सोनटक्के यांच्या मार्गदर्शनात सहा. पोलीस निरीक्षक व डीबी प्रमुख आनंद पिंगळे, हेड कॉन्स्टेबल सुदर्शन वानोळे, नापोका. अशोक टेकाडे, हरींदर भारती, पोलीस कॉन्स्टेबल पंकज उंबरकर, रत्नपाल मोहोड, विशाल गेडाम, मो. वसीम, शंकर चौधरी, दीपक वांड्रसवार यांनी केली. पुढील तपास पोलीस उप निरीक्षक हिरे, स.फौ. सोमेश्वर कुमरे व पो.का. भानुदास हेपट करीत आहे.

हे देखील वाचा:

ऍक्सिडेंटल नगराध्यक्ष… संजय देरकर…

खासदार ओवैसी यांचे घरावर हल्ला करणाऱ्यांवर कारवाई करा

Comments are closed.