संभाजी ब्रिगेडच्या माजी पदाधिका-यांसह 30 जणांचा भाजपात प्रवेश

अडेगाव येथे सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश

बहुगुणी डेस्क, वणी: अड़ेगाव येथे सुधीर मुनगंटीवार यांची सभा झाली. त्या सभेत संभाजी ब्रिगेडचे माजी तालुका अध्यक्ष प्रशांत बोबडे तसेच शाखा अध्यक्ष विजय भेदूरकर, निवृत्त पी.एस.आय. पुरूषोत्तम घोडाम यांच्या समवेत 30 कार्यकर्त्यांनी मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत भाजपा पक्षात प्रवेश घेतला. या कार्यक्रमाला आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, तारेंद्र बोर्डे,सतीश नाकले, संजय दातारकार आणि भाजपाचे ज्येष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला पाठींबा देत या कार्यकर्त्यांनी प्रवेश केला असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. प्रशांत बोबडे यांना महत्त्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावेळी सुरेश आत्राम, अरुण कोटणाके, प्रकाश धोंगडे, खुशाल शेरकी, ईश्वर धानोरकर, दीपक पाल, विलास झाडे , बंडू निब्रड, सचिन खामनकर, विलास चंदेल , लक्ष्मण मशिरकर, अतुल येवले, राजू पारखी, प्रकाश माशिरकर, विजय पानघाटे, विनोद काटकर, संतोष क्षिरसागर, बंडू आदी अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते,

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वावर मतदारांचा विश्वास – आ. बोदकुरवार
विकास हेच भाजपचे अंतिम ध्येय आहे. हे ध्येय घेऊनच भाजप वाटचाल करीत आहे. त्यामुळे सर्वसामान्य मतदारच नाही तर विविध पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी देखील आकर्षित होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्वावर सर्वसामन्य मतदारांचा विश्वास आहे. भाजपने केलेल्या विकासकामाला मतदार पसंती देत असून यावेळी भाजपचा विजय निश्चित आहे. असे मनोगत आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी व्यक्त केले.

Comments are closed.