अन्यथा रेशन मिळणार नाही…. रेशन कार्डाबाबत मोठी अपडेट

27 व 28 सप्टेंबर रोजी रेशन कार्डाला आधार कार्ड सिडिंग करण्याची संधी.... गावातील रास्त भाव दुकानदाराकडे जाऊन सिडिंग करण्याचे आवाहन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शासनाकडून गरिबांना कमी खर्चात किंवा मोफत रेशनही दिले जाते. शिधापत्रिकेच्या मदतीने गरीब लोकांना कुटुंबातील सदस्यांनुसार कमी किमतीत किंवा मोफत रेशन मिळते. ज्या शिधापत्रिकेला (रेशन कार्ड) आधार कार्डाला सिडिंग केलेले नाही. अशा रेशनकार्डधारकांना धान्य घेताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे बुधवारी दिनांक 27 सप्टेंबर व गुरुवारी दिनांक 28 सप्टेंबर रोजी तालुक्यातील रेशन कार्ड धारकांना रास्त धान्य दुकानदारांमार्फत आधार सिंडिग करण्याचे आवााहन करण्याचे आवाहन केले आहे. 

कशी आहे पद्धत?
आधार सिडिंग नसलेल्या रेशनकार्ड धारक लाभार्थ्यांना रास्तभाव धान्य दुकानदाराकडे आधारकार्ड घेऊन स्वत: जायचे आहे. ई-पॉस मशिनवर अंगठा लावून आपला आधार कार्ड क्रमांक eKYC द्वारा समाविष्ट करून घ्यायचा आहे. बुधवारी दिनांक 27 व 28 सप्टेंबर रोजी ही सुविधा रास्तभाव धान्य दुकानदाराकडे उपलब्ध राहणार आहे.

ज्या लाभार्थ्यांनी अद्याप रेशन कार्ड आधार कार्डाला सिडिंग केले नाही. त्यांना बुधवारी व गुरुवारी या सेवेचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे रेशनकार्ड धारकांनी तात्काळ रेशनकार्डाला आधारकार्ड सिडिंग करावे असे आवाहन तहसीलदार वणी यांनी केले आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.