पुष्पाताई आत्राम यांचा आदिवासी क्रांतीकन्या म्हणून गौरव

मुंबई येथील प्रा. सुरेंद्र गावस्कर सभागृहात पार पडला सोहळा

जितेंद्र कोठारी वणी : येथील सामाजिक कार्यकर्त्या पुष्पाताई आत्राम यांना आदिवासी क्रांतीकन्या म्हणून गौरविण्यात आले. साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते शंकर बळी यांनी संपादित केलेल्या आदिवासी क्रांतीकन्या या पुस्तकात पुष्पाताई आत्राम यांच्यावर एक प्रदीर्घ लेख लिहिलेला आहे. या पुस्तकाचे प्रकाशन दादर येथील मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या प्रा. सुरेंद्र गावस्कर सभागृह येथे झाले.

या सोहळ्याला माजी शिक्षणमंत्री वसंतराव पुरके उपस्थित होते. सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार तथा साहित्यिक प्रतिमा जोशी, सामाजिक कार्यकर्त्या अनिता महाजन, सुबोध मोरे साहित्यिक अर्जुन जवधने, प्रा. डॉ. डाखोरे, सुरेश दिगलासपुरकर, धनश्री धारप, देविका बळी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला. पुष्पाताई आत्राम यांना कार्यक्रमाच्या अध्यक्ष प्रतिमा जोशी यांच्या हस्ते सन्मानपत्र, शाल प्रदान करण्यात आली. यावेळी पुष्पाताई आत्राम यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सोबतच पुष्पाताई आत्राम यांनी शंकर बळी यांचा सपत्नीक सत्कार केला.

Comments
Loading...
error: कॉपी करू नका, बातमी आवडल्यास शेअर करा !!