वणीत दोन भंगारच्या दुकानावर प्रशासनाची कारवाई

दुकाने सील, 50-50 हजारांचा दंड वसूल

0

जितेंद्र कोठारी, वणी: जत्ररोड गोकुळनगर भागात भंगार खरेदी विक्रीचे ठोक व्यावसायिक वर्धमान स्टील स्क्रॅप व शकील ट्रेडर्स या दोन दुकानावर नगर परिषद व पोलीस पथकाने कार्यवाही केली आहे. हे दोन्ही दुकाने सध्या सील करण्यात आले असून लॉकडाउनचा कालावधी संपेपर्यंत हे दुकान सील राहणार आहे. दोन्ही आस्थापना कडून 50-50 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.

Podar School 2025

आज दुपारी 11 वाजताच्या दरम्यान प्रशासनाला जत्रारोडवरील भंगारचे दुकाने सुरु असल्याची माहिती मिळाली. त्यावरून प्रशासनाने 11.30 वाजताच्या दरम्यान वर्धमान स्टील स्क्रॅप व शकील ट्रेडर्सवर धाड टाकली. दरम्यान हे दोन्ही दुकाने सुरू असून तिथून व्यवसाय  सुरु असल्याचे प्रशासनाला आढळून आले. त्यानुसार प्रशानाने या दोन्ही दुकानावर प्रत्येकी 50 हजारांचा दंड वसूल केला आहे. 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

सदर कारवाई उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे व ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक गोपाल जाधव, मुख्याधिकारी महेश रामगुंडे, धम्मरत्न पाटील, सुनील खंडागळे, पंकज उंबरकर यांनी केली.

कोरोनाचे वाढते थैमान पाहता सरकारने लॉकडाऊनचे नियम आणखी कठोर  केले. यात अत्यावश्यक सेवेत नसणा-यां दुकाने सुरू असल्यास अशा दुकानाला सील करून दुकानदारावर 50 हजारांच्या दंडाची तरतूद केली आहे. मात्र दंडाची रक्कम अधिक असतानाही लॉकडाऊनचे नियम तोडले जाताना दिसत आहे. याआधी दोन कापड केंद्र, एक फोटो स्टुडिओ तसेच एका बारवर कारवाई करण्यात आली आहे.

लिंकवर क्लिक करून पाहा व्हिडीओ…

हे देखील वाचा:

क्रुझरला कट मारल्याच्या कारणावरून राडा

आज शहरात अवघा 1 रुग्ण, ऍक्टिव्ह रुग्णसंख्या झपाट्याने खाली

Leave A Reply

Your email address will not be published.