लॉ कॉलेजमध्ये प्रवेश घेण्याचे आवाहन

25 मार्च फॉर्म भरण्याची अंतिम तारीख

0

वणी:  वणी पासून 22 किलोमीटर अंतरावर असलेल्या मारेगाव तालुक्यातील बुरांडा (खडकी) येथील नुरजहां बेगम सलाम अहेमद लॉ कॉलेजमध्ये नवीन सत्रासाठी प्रवेश घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तीनवर्षांसाठीच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 25 मार्च आहे. त्यामुळे पदवीधारक महिला व पुरुष उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावे, असे आवाहन प्राचार्यांनी केले आहे.

बॅचलर ऑफ लॉ म्हणजेच एलएलबी हा अभ्सासक्रम तीन आणि पाच वर्षांचा आहे. 12 वी नंतर पाच वर्ष व पदवी नंतर हा अभ्यासक्रम 3 वर्षांचा आहे. 12 वि नंतर च्या प्रवेशाची अंतिम तारीख 18 मार्च होती तर पदवीनंतर प्रवेशाची अंतिम तारीख ही 25 मार्च म्हणजे सोमवार पर्यंत आहे. फॉर्म भरल्यानंतर पदवी नंतरच्या अभ्सासक्रमासाठी 11 मे रोजी सीईटी परिक्षा आहे.

तीन वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी कोणताही पदवीधर, पदव्युत्तर महिला तसेच पुरुष अर्ज करू शकते. तसेच ज्या ज्या विद्यार्थी व विद्यार्थीनींना अर्ज भरायचा आहे, त्यांना सीईटी परीक्षेचा फॉर्म कॉलेजतर्फे निःशुल्क भरून दिला जाणार आहे. इच्छुक विद्यार्थी व विद्यार्थीनींनी या सेवेचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी 9323733369, 9960877996, 7020090496, 8805060950 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बुरांडा येथील एनबीएसए लॉ कॉलेज हे भारतातील एकमेव महिला लॉ कॉलेज मानलं जातं. आता यासत्रापासून इथे महिलांसह पुरुषांसाठीही तीन वर्षांच्या अभ्यासक्रम सुरू कऱण्यात (प्रस्तावित) येत आहेे. बुरांडा येथील लॉ कॉलेज संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाशी संलग्न आहे. तसेच बार काउंसिल ऑफ इंडिया, नवी दिल्ली याची देखील या कॉलेजला मान्यता प्राप्त आहे. तरी परिसरातील अधिकाधिक विद्यार्थ्यांनी (महिला व पुरुष) या महाविद्यालयात प्रवेश घ्यावा असे आवाहन कॉलेजच्या प्राचार्यांनी केले आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.