वणीतील पहिल्या फॅशन व इंटेरिअर इन्स्टिट्युटमध्ये प्रवेश सुरू
कॅडेन्स अकाडमीची प्रवेश प्रक्रिया सुरू
विवेक पिदूरकर: देशभरात नावाजलेली कॅडेन्स अकाडमी या फॅशन डिझायनिंग आणि इंटेरिअर डिझायनिंगची शाखा गेल्या वर्षीपासून वणीत सुरू झाली असून यावर्षीच्या सत्रासाठी विविध कोर्ससाठी प्रवेश सुरू झाला आहे. यासाठी वणीतील विद्यार्थ्यांना ऑफलाईन तसेच बाहेरगावातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. येत्या 6 सप्टेंबरपासून फॅशन आणि इंटेरिअरची यावर्षीची डिप्लोमा कोर्सची पहिली बॅच सुरू होणार असल्याने तात्काळ आपला प्रवेश निश्चित करावा असे आवाहन कॅडन्स अकाडमीतर्फे करण्यात आले आहे.
कॅडेन्स अकाडमीद्वारा 10 वी व 12 ऩंतर फॅशन आणि इंटेरिअर डिझायनिंगसाठी तीन कोर्स उपलब्ध करून दिले गेले आहे. यात 10 वी नंतर एक वर्षाचा डिप्लोमा कोर्स व दोन वर्षांचा ऍडव्हान्स डिप्लोमा तर 12 वी नंतर तीन वर्षांचा डिग्री कोर्स उपलब्ध आहे. वणीतील विद्यार्थ्यांना कॅडेन्स अकाडमी, दुसरा मजला, युनियन बँकेच्यावर आबड भवन समोर वणी येथे संपर्क साधून ऍडमिशन करता येईल तर बाहेरगावाच्या विद्यार्थ्यांना गुगल फॉर्म भरून (लिंक – https://forms.gle/Q6JHRWYSm8bd4Lo47 ) ऍडमिशन करता येईल.
आता कोर्ससाठी बाहेरगावी जाण्याची गरज नाही
अलिकडच्या काळात इंटेरिअर डिझायनिंग आणि फॅशन डिझायनिंग या कोर्सला चांगलेच ग्लॅमर आले आहे. वणी आणि परिसरातील शेकडो विद्यार्थी हा कोर्स करण्यासाठी नागपूर, हैदराबाद, पुणे, मुंबई येथे जातात. त्यात त्यांचा मोठ्या प्रमाणात खर्च व्हायचा. मात्र आता वणीतच हा कोर्स उपलब्ध झाल्याने त्याचा मोठा फायदा परिसरात विद्यार्थ्यांना होणार आहे. शिवाय ज्या मुलींना हॉस्टेलची सुविधा हवी आहे अशा विद्यार्थ्यींनींना हॉस्टेलची सुविधा देखील उपलब्ध करून दिली जाणार आहे.
– मुकेश काठेड, विशाल डुंगरवाल कॅडेन्स अकाडमी
कॅडेन्स अकाडमी ही फॅशन आणि इंटेरिअर डिझायनिंगमधली देशातील एक नामवंत शैक्षणिक संस्था असून त्याची नागपूर, पुणे, रायपूर, हैदराबाद, अमरावती अशा मोठ्या शहरात 20 पेक्षा अधिक शाखा आहे. या कोर्ससाठी मेट्रोसिटीतील तज्ज्ञ फॅकल्टी विद्यार्थ्यांना शिकवणार आहेत. तसेच वार्षिक फॅशन शो, प्रदर्शनी यासह पास होणा-या विद्यार्थ्यांच्या जॉबसाठी प्लेसमेन्ट व्यवस्थाही अकादमीतर्फे करून दिली जाणार आहे.
कोर्ससाठी मोजक्या जागा असून प्रवेश मिळवण्यासाठी व अधिक माहितीसाठी लवकरात लवकर संपर्क साधावा असे आवाहन कॅडेन्स अकाडमीतर्फे करण्यात आले आहे.
पत्ता: कॅडेन्स अकाडमी, आबड भवन समोर, दुसरा माळा, युनियन बँकेच्या वर टागोर चौक वणी
अधिक माहितीसाठी संपर्क: 8924842842 8924843843
ऑनलाईन ऍडमिशनसाठी लिंक: https://forms.gle/Q6JHRWYSm8bd4Lo47