शुभम गोरे यांची भाजयुमो तालुका अध्यक्षपदी निवड

आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांची प्रमुख उपस्थिती

0

विवेक तोटेवार, वणी: भारतीय जनता युवा मोर्चाच्या तालुका अध्यक्षपदी शुभम गोरे यांनी निवड करण्यात आली आहे. माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांच्या मार्गदर्शनात आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांच्या नेतृत्वात ही निवड करण्यात आली आहे. यावेळी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे दिनकर पावडे, विजय पिदूरकर, संजय पिंपळशेन्डे गजानन विधाते यांची प्रमुख उपस्थिती होती.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

तसेच प्रमोद क्षीरसागर, भाजपा वणी तालुक्याचे पदाधिकारी शंकर बादुरकर, कैलाश पिपराडे, दिपक मत्ते, प्रदीप जेऊरकर, संजय झाडे, मुकेश खिरटकर, दिपक पाऊनकर (संयोजक,सोशल मिडिया वणी तालुका) यांच्यासह सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.