वणीत शनिवारी सर्वपक्षीय चक्काजाम आंदोलन
सहभागी होऊन शेतकरी आंदोलनाला समर्थन देण्याचे आवाहन
जब्बार चीनी, वणी: संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने शनिवारी दिनांक 6 फेब्रुवारी रोजी वणीत चक्काजाम आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनात भाजप वगळता सर्वच पक्ष तसेच शहरातील विविध सामाजिक संघटना सहभागी होणार आहे. हे आंदोलन सकाळी 11 वाजता रेल्वे क्रॉसिंग टोलनाका ते गुंजचा मारोती चौक येथे होणार आहे. सध्या दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनात हे आंदोलन पुकारण्यात आले आहे.
तिन्ही कृषी कायदे मागे घ्यावे तसेच केंद्र सरकारने आंदोलकांची केलेली मुस्कटदाबी बंद करावी या मागणीसाठी दिनांक 6 फेब्रुवारी देशव्यापी रास्ता रोको आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. त्याच अनुशंगाने वणीत देखील विविध पक्ष संघटना व सामाजिक संघटनांद्वारे हे आंदोलन करण्यात येणार आहे. यासंदर्भात झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत एकमताने हा निर्णय घेण्यात आला.
या आंदोलनात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, संभाजी ब्रिगेड, बहुजन समाज पार्टी, वंचित बहुजन आघाडी व इतर सामाजिक संघटना सहभागी होणार आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
केंद्र सरकारने पारीत केलेल्या 3 कृषी विधेयकाविरोधात सध्या दिल्ली येथे जोरदार आंदोलन सुरू आहे. हे तिन्ही विधेयक मागे घ्यावे या मागणीसाठी गेल्या दोन ते अडिच महिन्यांपासून दिल्ली येथे सिमेवर शेतकरी आंदोलनाला बसले आहे. सरकारने शेतक-यांबाबतची चर्चा थांबवली असून आंदोलकांची मुस्कटदाबी करण्यासाठी सिमेवर तारांचे कुंपण आणि खिळे याचे प्रतिरोधक तयार केले आहे. याशिवाय आंदोलकांची रसद तोडून त्या भागातील इंटरनेट सेवा देखील बंद करण्यात आली आहे.
हे देखील वाचा:
शेतकरी आंदोलनाच्या समर्थनात शनिवारी मारेगावात चक्काचाम आंदोलन